Mumbai: जुन्या वादातून अल्पवयीन मुलाची भररस्त्यात तलवारीनं हत्या, मुंबईतील गोवंडी येथील घटना-mumbai murder minor boy dies after attacked with sword in govandi shivaji nagar ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai: जुन्या वादातून अल्पवयीन मुलाची भररस्त्यात तलवारीनं हत्या, मुंबईतील गोवंडी येथील घटना

Mumbai: जुन्या वादातून अल्पवयीन मुलाची भररस्त्यात तलवारीनं हत्या, मुंबईतील गोवंडी येथील घटना

Aug 13, 2024 07:07 PM IST

Mumbai Minor Boy Murder: मुंबईतील गोवंडी येथील शिवाजी नगर परिसरात जुन्या वादातून १७ वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली.

मुंबईत गोवंडी येथे अल्पवयीन मुलाची तलवारीने हत्या
मुंबईत गोवंडी येथे अल्पवयीन मुलाची तलवारीने हत्या

Mumbai Murder: मुंबईतील गोवंडी येथील शिवाजी नगर परिसरातून धक्कादायक माहिती समोर आली. जुन्या वादातून एका १७ वर्षीय मुलाची भररस्त्यात तलवारीने हत्या करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यात मृत तरुण एक आरोपी रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अल्पवयीन मुलावर तलवारीने हल्ला करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या अधारे पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमद पठाण असे मृत मुलाचे नाव आहे. मंगळवारी अहमद यांच्यावर एका वर्दळीच्या रस्त्यावर हल्ला करण्यात आला. आरोपीसह तीन ते चार जण तलवारी, काठ्या घेऊन आले आणि त्यांनी त्याच्यावर हल्ला केला. अहमदने मदतीसाठी आरडाओरडा केला. परंतु, हल्लेखोर एकामागून एक प्रहार करत असताना रस्त्यावरील कोणत्याही व्यक्तीने हस्तक्षेप करण्याची हिंमत दाखवली नाही. या घटनेत पीडित आणि हल्लेखोर एकमेकांना ओळखत होते आणि १५ दिवसांपूर्वी एका मुद्द्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. हा हल्ला नियोजित होता आणि सविस्तर नियोजन करून आरोपींनी हा हल्ला केला.

आपचे मुंबई सहसचिव साजिद खान यांनी गोवंडीतील अल्पवयीन मुलाच्या हत्येवर बोलताना या घटनेमागे ड्रग्ज विकणाऱ्यांचा हात असल्याचा आरोप केला आहे.गोवंडीमध्ये ड्रग्जचा व्यापार होत आहे आणि रोड नंबर १ ते रोड नंबर १४ हा ड्रग्सच्या व्यापाराचा केंद्र बनला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. ड्रग्ज घेण्यासाठी उच्च शिक्षित लोक बीएमडब्ल्यू आणि इतर लक्झरी कार करून या ठिकाणी येतात.

कोलकात्यात पदव्युत्तर द्वितीय वर्षाच्या निवासी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. वैद्यकीय अहवालात पीडितेच्या पोटाला, ओठांना, बोटांना आणि डाव्या पायाला जखमा झाल्या आहेत. पीडितेचे तोंड झाकण्यात आले होते आणि तिचे डोके भिंतीवर किंवा जमिनीवर आदळण्यात आले. याप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनने तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच ४८ तासांच्या आत मागण्या मान्य न झाल्यास देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आयएमएने प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या हत्येबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आणि कॅम्पसमध्ये असा जघन्य गुन्हा घडू देणाऱ्या सद्यपरिस्थितीचा निषेध केला.

विभाग