Women Found Dead In Malad: मुंबईच्या मालाडमध्ये राहत्या घरात एका ८९ वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. या महिलेच्या डोक्याची दुखापत पाहून तिची हत्या झाली असावी, असा पोलिसांनी संशय आहे. या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. या महिलेच्या नातूने दिलेल्या तक्रारीवरून मालाड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी मालाड पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
शांताबाई कुराडे असे मृत महिलेचे नाव आहे. शांताबाई या मालाड येथील सुभाष डी चाळमधील आठ क्रमांकाच्या खोलीत राहत होत्या. भीक मागून ती आपला उदरनिर्वाह करत होत्या. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या घराचा दरवाजा बंद असल्याने स्थानिक रहिवाशांचा संशय बळावला, त्यांनी मालाड पोलिसांना माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळताच मालाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी शांताबाई यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. या महिलेच्या डोक्याला दुखापत झाल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले. आर्थिक वादातून ही हत्या झाली असावी, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गोरेगाव येथील सिद्धार्थ रुग्णालयात पाठवला आहे.
शांताबाई यांचा नातू राजेश शिंदे याच्या तक्रारीवरून मालाड पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. हत्येनंतर पळून गेलेल्या मारेकऱ्याचा शोध सुरू असून, हल्लेखोर मृत महिलेला ओळखत असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पुण्यात चारित्र्याच्या संशयावरून एक व्यक्तीने पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. उपेंद्र हुडके असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा मूळचा नेपाळमधील बाचकुट या गावातील रहिवाशी आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तो पत्नीसह पुण्यातील वाकड येथे वास्तव्यास होता. दरम्यान, ११ मे २०२४ रोजी किरकोळ कारणांवरून पत्नीशी झालेल्या वादानंतर उमेंद्रने कहरच केला. त्याने पत्नीला मारहाण करत तिच्या गुप्तांगाच्या दोन्ही बाजूला खिळे ठोकले आणि कुलूप लावले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
संबंधित बातम्या