मुंबई महापालिकेचा करबुडव्यांना दणका! ६०० कोटी रुपये थकवणाऱ्यांना १० लोकांच्या मालमत्तेची जप्ती सुरू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबई महापालिकेचा करबुडव्यांना दणका! ६०० कोटी रुपये थकवणाऱ्यांना १० लोकांच्या मालमत्तेची जप्ती सुरू

मुंबई महापालिकेचा करबुडव्यांना दणका! ६०० कोटी रुपये थकवणाऱ्यांना १० लोकांच्या मालमत्तेची जप्ती सुरू

Nov 22, 2024 11:21 AM IST

bmc action against tax defaulters : मुंबई महानगर पालिकेने कर बुडव्यांवर कारवाई सुरू केली आहे. मालमत्ता कराच्या बड्या थकबाकीदारांची यादी जाहीर करण्यात आली असून मालमत्ता जप्त केली जात आहे.

मुंबई महानगर पालिकेचा करबुड्यांना दणका! जप्तीची कारवाई सुरू; दहा जणांकडे तब्बल ६०० कोटी रुपये थकीत
मुंबई महानगर पालिकेचा करबुड्यांना दणका! जप्तीची कारवाई सुरू; दहा जणांकडे तब्बल ६०० कोटी रुपये थकीत

bmc action against tax defaulters : मुंबई महागर पालिकेने कर बुडव्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. क्षमता असूनही कर न भरणाऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून त्यांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू करण्यात आली आहे. या यादीत तब्बल १० जणांकडे ६०० कोटी पेक्षा अधिक रक्कम थकीत असल्याच उघड झालं आहे.

मुंबईत निर्धारित कालावधीमध्ये मालमत्ता कराचा भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या व त्यांची आर्थिक क्षमता असतांना देखील कार न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना मुंबई महापालिकेने कारवाईचा बडगा उभारला आहे. त्यांच्या मालमत्ता जप्तीची नोटिसा बजावण्यात आली आहेत. त्यांना देण्यात आलेल्या मुदतीत जर त्यांनी कर भरला नाही तर महापालिका अधिनियमातील तरतुदींनुसार त्यांच्या मालमत्तेतील वस्तू जप्त करण्यात येणार असून त्यांचा लिलाव करून थकीत रक्कम वसूल केली जाणार आहे.

१० जणांकडे ६०० कोटी पेक्षा अधिक रक्कम थकीत

मुंबई महानगर पालिकेने जाहीर केलेल्या यादीत १० जणांकडे ६०० कोटी पेक्षा अधिक रक्कम थकीत असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यांनी ही रक्कम जमा न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत

मुंबई महानगर पालिकेचे करसंकलन हा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. मालमत्ता कर देयके मिळाल्यापासून ९० दिवसांच्या आत महापालिकेकडे मालमत्ता कर जमा करणे गरजेचे आहे. त्यामुळे या कालावधीत कर न भरल्यास महापालिकेकडून थेट कारवाई करण्यात येते.

अशी केली जाते कारवाई

महानगर पालिका थकबाकीदारांना आधी थकीत करासंदर्भात नोटिस पाठवते. यानंतर कर निर्धारण व संकलन विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष संपर्क व संवाद साधून मालमत्ता कर भरण्यासाठी मागोवा घेतात. तरी सुद्धा जर कर भरला नाही तर. त्यांना 'डिमांड लेटर' पाठवण्यात येते. यानंतर पुढच्या टप्प्यात मालमत्ताधारकास २१ दिवसांची अंतिम नोटीस दिली जाते. व त्यानंतर कारवाई केली जाते.

सूचना, नोटिसा देऊनही करभरण्यास उदासीनता

महानगर पालिकेने काही मोठ्या थकबाकीदारांना नोटिसा बाजवल्या आहेत. मात्र, त्यांनी अद्याप कार भरलेला नाही. त्यांना वेळोवेळी सूचना देऊनही योग्य प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे जप्तीच्या नोटिसा या थकबाकीदारांना बजावण्यात आल्या आहेत. .

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर