मुंबईकरांच पण्याचं बजेट वाढणार! नव्या वर्षात पाणीपट्टी 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबईकरांच पण्याचं बजेट वाढणार! नव्या वर्षात पाणीपट्टी 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार

मुंबईकरांच पण्याचं बजेट वाढणार! नव्या वर्षात पाणीपट्टी 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार

Dec 26, 2024 11:06 AM IST

Mumbai water News : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पालिका पाणीपट्टी वाढवण्याच्या विचारात असून यामुळे मुंबईकरांच्या बजेटमध्ये वाढ होणार आहे.

मुंबईकरांच पण्याचं बजेट वाढणार! नव्या वर्षात पाणीपट्टी 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार
मुंबईकरांच पण्याचं बजेट वाढणार! नव्या वर्षात पाणीपट्टी 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार

Mumbai water News : वर्ष २०२४ संपत आले आहे. नवीन वर्ष काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. या नवीन वर्षात पालिका महत्वाचा व मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. या निर्णयामुळे मुंबईकरांच्या खिशावर परिणाम होणार असून त्यांचं महिन्याचं गणित कोलमडण्याची शक्यता आहे. मुंबई महानगर पालिका पाणीपट्टी वाढवण्याच्या विचारात आहे. या दरवाढीला विरोधी पक्षांनी विरोध दर्शवला आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत पाणी वाटपाचं नियोजन केलं जात. नागरिकांना नळाद्वारे पाणी पुरवले जाते. या पाणी पुरवठ्यासाठी महानगर पालिकेकडून पाणी पट्टी आकारली जाते. काही ठिकाणी पालिकेने पाण्याचा किती वापर झाला हे तपासण्यासाठी मीटर बसवले आहे. या मीटरनुसार पाणी पट्टी आकारली जाते.

गेल्या दोन वर्षांपासून मुंबईत पाणीपट्टी वाढवण्यात आली नव्हती. त्यामुळे पालिका प्रशासन सध्या मुंबईकरांच्या पाणीपट्टीमध्ये ८ टक्क्यांनी वाढ करण्याचा विचारात आहे. या बाबतचा प्रस्ताव पालिकेच्या जल अभियंता विभागानं सादर केला आहे. या बाबतच निर्णय हे बृन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी घेणार आहे. पाणीपुरवठ्याच्या कामांमध्ये खर्चाचा भार वाढत असल्याने ही पाणी पट्टी वाढ गरजेची असल्याचं मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे.

२०२० मध्ये देखील पालिकेने पाणी पट्टी वाढवण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनामुळे हा निर्णय रद्द करण्यात आला होता. यानंतर देखील पाणी पट्टी वाढवण्याचा निर्णय हा रद्द करण्यात आला होता. मात्र, पालिकेचा खर्च वाढला असल्याने व पाइपलाइनच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च देखील मोठा असल्याने या खर्चाचा ताळमेळ बसवण्यासाठी पाणी पट्टीत ८ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

मुंबईला सध्या मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून पाणी पुरवले जाते. रोज साधारण ३,९५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा शहराला केला जातो. हे पाणी घेतांना जलवाहिन्यांद्वारे आणले जाते. तसेच पाणी पुरवठा, ते शुद्ध करण्यासाठी व अस्थापना खर्च आदि साठी मोठा खर्च पालिकेला करावा लागतो. यामुळे मोठा खर्च वाढत आहे. मात्र,  मुंबई महापालिका निवडणुका पुढील काही महिन्यात होण्याची शक्यता असल्याने  मुंबईवरील पाणी पट्टीत वाढ करण्याचा निर्णय रद्द होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.  प्रशासनाने दरवाढ करण्याचा प्रयत्न करण्यास, आम्ही विरोध करू, अशी भुमिका विरोधी पक्षांनी घेतली आहे.  

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर