मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dasra Melava 2022 : शिवाजी पार्कवर कुणालाच परवानगी नाही; बीएमसीनं दोन्ही गटांचा अर्ज नाकारला

Dasra Melava 2022 : शिवाजी पार्कवर कुणालाच परवानगी नाही; बीएमसीनं दोन्ही गटांचा अर्ज नाकारला

HT Marathi Desk HT Marathi
Sep 22, 2022 12:24 PM IST

Dasra Melava 2022 : दादरमधील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटानंही अर्ज केला होता. परंतु आता मुंबई महापालिकेनं दोन्ही गटांना धक्का दिला आहे.

Shivsena vs Shinde Group On Dasra Melava 2022
Shivsena vs Shinde Group On Dasra Melava 2022 (HT)

Shivsena vs Shinde Group On Dasra Melava 2022 : येत्या २७ सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी होणार आहे. त्याआधीच आता शिवसेना आणि शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण दसरा मेळाव्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटानं मुंबई महापालिकेसाठी अर्ज केला होता. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये शिवाजी पार्क मैदान मेळावं, यासाठी स्पर्धा लागलेली होती. परंतु आता मुंबई महापालिकेनं शिवसेना आणि शिंदे गट अशा दोघांनाही मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचं मैदानाला परवानगी देण्याचा अर्ज फेटाळल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळं आता शिवसेना कोणत्या मैदानावर दसरा मेळावा घेणार?, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेनं मुंबई महापालिकेकडे अर्ज केला होता. त्यानंतर शिंदे गटानंही बीएमसीकडे मैदानासाठी अर्ज केला होता. त्यानंतर अद्याप कोणत्याही गटाला परवानगी देण्यात आलेली नव्हती. परंतु आता महापालिकेनं दोन्ही गटांना परवानगी नाकारल्याची माहिती समोर येत आहे.

शिवसेनेची हायकोर्टात धाव...

मुंबई महापालिकेनं शिवसेनेचा अर्ज नाकारल्यानंतर आता शिवसेनेनं याविरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. रितसर आणि सर्वात आधी अर्ज करूनही महापालिका आम्हाला अर्ज कसा काय नाकारू शकते?, असा आरोप शिवसेनेनं केला आहे. त्यानंतर आता या प्रकरणावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेनं बीकेसी मैदान मिळावं म्हणून एमएमआरडीएकडे अर्ज केला होता. त्याचवेळी शिंदे गटानंही बीकेसी मैदान मिळावं म्हणून अर्ज केला. परंतु आता एमएमआरडीए प्रशासनानं शिवसेनेचा अर्ज नाकारत शिंदे गटाला दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली आहे. परंतु शिवसेनेचा दसरा मेळावा हा दादरमधील शिवाजी पार्कमध्येच होणार असल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी गटप्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना केलं आहे.

IPL_Entry_Point