Mumbai Weather News: मुंबईत शुक्रवारी सकाळी पाऊस झाला. मात्र, या पावसामुळे शहरातील अनेक भागांत वाहतूक कोंडी झाली. परिणामी, सकाळी कामावर निघालेल्या अनेक समस्यांना सामोरे जावा लागले. यावर संतापलेल्या मुंबईकरांनी सोशल मीडियाद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अनेक नागरिकांनी प्रमुख जंक्शन्सवर सिग्नल सुरू नसल्याच्या तक्रारी केल्या. तर, काहींनी सांगितले की, मोठ्या प्रमाणावर वाहतूक हाताळण्यासाठी वाहतूक पोलीस नाहीत. कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी सकाळच्या वेळेत होणाऱ्या गर्दीमुळे २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ एकाच ठिकाणी अडकून पडल्याची तक्रार मुंबईकरांनी केली आहे.
मुंबईचे तापमान किमान २६ अंश सेल्सिअस ते कमाल ३४ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची अपेक्षा आहे. दक्षिण- नैऋत्येकडून ९.३ किमी/ताशी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. सूर्योदय सकाळी ०६:०१ वाजता झाला आणि सूर्यास्त संध्याकाळी ०७:१७ वाजता होईल. शनिवार आणि रविवार अनुक्रमे २५ अंश सेल्सिअस आणि २५ अंश सेल्सिअस या किमान तापमानासह सुरू होण्याची अपेक्षा आहे. तपमानात किंचित घट होऊन आगामी आठवड्यातही अशीच हवामानाची स्थिती अपेक्षित आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत पुढच्या आठवड्यात ढगाळ आकाश आणि मधूनमधून पावसाच्या सरी कोसळतील. मंगळवार ते गुरुवारपर्यंत ढगाळ आकाश राहण्याचा अंदाज आहे. मुंबई आणि एमएमआर (मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन) भागात मान्सूनचे आगमन झाल्यामुळे शहरात आठवडाभर पाऊस पडत राहील.
संबंधित बातम्या