मुंबई मेट्रो ३ च्या बीकेसी स्थानकात आग आणि धुराचे लोट; मेट्रोची सेवा तात्पुरती बंद
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबई मेट्रो ३ च्या बीकेसी स्थानकात आग आणि धुराचे लोट; मेट्रोची सेवा तात्पुरती बंद

मुंबई मेट्रो ३ च्या बीकेसी स्थानकात आग आणि धुराचे लोट; मेट्रोची सेवा तात्पुरती बंद

Published Nov 15, 2024 03:10 PM IST

BKC Metro station fire Marathi news : मुंबई मेट्रो ३ मार्गावरील बीकेसी स्थानकात आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळं या मार्गावरील मेट्रो सेवा विस्कळीत झाली आहे.

मेट्रोच्या बीकेसी स्थानकात आग; मेट्रोची सेवा ठप्प
मेट्रोच्या बीकेसी स्थानकात आग; मेट्रोची सेवा ठप्प

Metro 3 BKC station fire : नव्यानं सुरू झालेल्या मुंबई मेट्रो ३ मार्गावरील बीकेसी स्थानकावर आग लागल्यानं मेट्रो सेवा आज ठप्प झाली. मेट्रो ३ मार्गावर अपघाताची ही दुसरी घटना आहे. याआधी शनिवारी तांत्रिक बिघाडामुळं सुमारे तासभर प्रवाशांना अंडरग्राउंड स्थानकात अडकून पडावं लागलं होतं.

बीकेसी स्थानकात एन्ट्री/एक्झिट ए-४ च्या बाहेर ही आग लागली. आगीनंतर उठलेले धुराचे लोट स्थानकात शिरल्यानं मेट्रोची प्रवासी सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी पोहोचलं असून सर्वकाही सुरळीत करण्याचं काम सुरू आहे.

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सेवा बंद केली आहे. एमएमआरसी आणि डीएमआरसीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आहेत. पर्यायी बोर्डिंगसाठी वांद्रे कॉलनी स्थानकात जा. तुमच्या समजूतदारपणाबद्दल धन्यवाद,' असं मुंबई मेट्रोनं शेअर केलेल्या अधिकृत अपडेटमध्ये म्हटलं आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, दुपारी १ वाजून १० मिनिटांनी ही आग लागली. स्टेशनच्या आत ४० ते ५० फूट खोलीवर लाकडी चादरी, फर्निचर आणि बांधकाम साहित्याला ही आग लागली. ही आग तेवढ्यापुरतीच मर्यादित होती. मात्र त्यामुळं परिसरात प्रचंड धूर पसरला होता. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

उद्घाटन झाल्यापासून अडथळ्यांची मालिका

बीकेसी मेट्रो स्टेशन १२.६९ किमी लांबीच्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (मुंबई मेट्रो ३) किंवा अ‍ॅक्वा लाइन कॉरिडॉरचा भाग आहे. कुलाबा ते आरे जेव्हीएलआर दरम्यान पसरलेल्या मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रो कॉरिडॉरच्या १२.६९ किमी लांबीच्या आरे जेव्हीएलआर- वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मार्गावरील मेट्रो सेवेच्या पहिल्या टप्प्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात हिरवा झेंडा दाखवला होता. मात्र, तेव्हापासून या मेट्रो सेवेत अनेकदा अडथळे आले आहेत. शनिवारीही देखील या मार्गावर तांत्रिक बिघाड झाला होता. आज पुन्हा मेट्रो सेवा विस्कळीत झाल्यानं कार्यालयीन कर्मचारी हवालदिल झाले. मंगळवारीही रेल्वे विलंबाला सामोरं जावं लागल्याची तक्रार काही प्रवाशांनी केली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर