Mumbai Metro 3: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई मेट्रो लाइन-३ चे उद्घाटन
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Metro 3: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई मेट्रो लाइन-३ चे उद्घाटन

Mumbai Metro 3: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई मेट्रो लाइन-३ चे उद्घाटन

Updated Oct 05, 2024 11:41 PM IST

Mumbai Metro 3 inauguration by PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ ऑक्टोबर रोजी मुंबई मेट्रो लाइन ३ च्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) ते आरे जेव्हीएलआर विभागाला हिरवा झेंडा दाखवला.

मोदींच्या हस्ते मुंबई मेट्रो लाइन-३ चे उद्घाटन
मोदींच्या हस्ते मुंबई मेट्रो लाइन-३ चे उद्घाटन (Mumbai Metro Rail Corporation Limited)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (५ ऑक्टोबर २०२४) मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रो लाइन ३ चे उद्घाटन करण्यात आले. यामुळे दक्षिण मुंबईतील रिअल इस्टेट बाजारपेठेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे, असे रिअल इस्टेट डेव्हलपर्स आणि तज्ज्ञांनी हिंदुस्तान टाईम्स बोलताना सांगितले.

मेट्रो लाईन-३ मध्ये १२.६९ किमी अंतरात एकूण १० मेट्रो स्थानक आहेत. संपूर्ण मेट्रो-३ कॉरिडॉर सुमारे ३३ किमी लांबीचा आहे. मेट्रो लाइन- ३ मुळे बीकेसी, प्रभादेवी, दादर, वरळी, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, मरीन लाइन्स, चर्चगेट, नरिमन पॉईंट, कफ परेड आणि मुंबई विमानतळाच्या आजूबाजूच्या भागांमधील कनेक्टिव्हिटी सुधारण्याची अपेक्षा आहे.

रिअल इस्टेट मार्केटला चालना मिळण्याची अपेक्षा

रिअल इस्टेट तज्ज्ञांच्या मते, नवीन मेट्रो कनेक्टरमुळे दक्षिण मुंबई आणि मुंबईच्या उपनगरीय भागांमधील कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि रिअल इस्टेट मार्केटला ही चालना मिळेल.

मुंबईकरांचा वेळ वाचणार

दक्षिण मुंबईतील अनेक रहिवासी वरळी, लोअर परळ, बीकेसी, विमानतळ आणि अंधेरीसारख्या व्यावसायिक केंद्रांमध्ये काम करतात. या सुधारित कनेक्टिव्हिटीमुळे दक्षिण मुंबईत राहणारे मध्यमवर्गीय आणि व्यावसायिकांना मोठा फायदा होईल, जे कामानिमित्त बीकेसी, मध्य मुंबई किंवा उपनगरात जातात,' असे दक्षिण मुंबईतील रिअल इस्टेट सल्लागारांची शिखर संस्था स्मार्ट (साऊथ मेट्रोसिटी असोसिएशन ऑफ रिअॅल्टर्स) चे अध्यक्ष प्रमोद व्यास यांनी सांगितले.

कनेक्टिव्हिटी पुनर्विकास प्रकल्पांसाठी संधी

कॉर्पोरेट्स, वरिष्ठ अधिकारी, सीईओ आणि सीएक्सओ यांच्यासाठी ही कनेक्टिव्हिटी पुनर्विकास प्रकल्पांसाठी संधी खुली करते. बीकेसी आणि अंधेरी पूर्व भागात काम करताना अनेक वरिष्ठ अधिकारी दक्षिण मुंबईत राहणे पसंत करतात. मेट्रो -३ कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय वाढ करेल आणि सुधारित कनेक्टिव्हिटीमुळे रिअल इस्टेटला नेहमीच फायदा होईल. दक्षिण मुंबईत सध्या नवीन ग्रेड ए व्यावसायिक कार्यालयांसाठी मर्यादित पर्याय किंवा पाईपलाईन आहेत, परंतु भविष्यात ते बदलण्याची अपेक्षा करू शकतो.

दक्षिण व मध्य मुंबईतील फ्लॅटचा दर वाढण्याची शक्यता

सध्या दक्षिण मुंबई आणि मध्य मुंबईतील फ्लॅटचा दर परिसर आणि इतर अनेक घटकांनुसार प्रति चौरस फूट ४५ हजार ते १.५० लाख रुपये प्रति चौरस फूट आहे, असे स्थानिक दलालांनी सांगितले. लोढा, गोदरेज, सनटेक, प्रेस्टीज, पूर्वांकारा यांसारख्या रिअल इस्टेट डेव्हलपर्सची दक्षिण मुंबईतील रिअल इस्टेट मार्केटमध्ये उपस्थिती आहे.

दर्जेदार जागा उपलब्ध नसल्याने दक्षिण मुंबईतील कार्यालयांचे भाडे १५० ते २५० रुपये प्रति चौरस फुटाच्या आसपास स्थिर झाले. त्या तुलनेत गेल्या पाच वर्षांत बीकेसीतील दर वाढले आहेत, असे स्थानिक दलालांनी सांगितले. बीकेसीमध्ये कार्यालयाचे भाडे प्रति चौरस २५० ते ५०० रुपयांपर्यंत आहे. अल्पमुदतीच्या व्यवहारासाठी त्यांनी ७०० रुपयांचा टप्पाही गाठला आहे, अशी माहिती ब्रोकर्सने दिली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर