२३ मे ते ३१ मे दरम्यान प्रवासाचे नियोजन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. मुंबईतील मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील फलाट क्रमांक १० व ११ च्या च्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. यानिमित्त उद्यापासून (२३ मे) ते ३१ मे पर्यंत दररोज रात्री १२.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत रात्रंकालीन चार तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार या ब्लॉकमुळे मुंबई-पुणे प्रगती एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस आणि मुंबई ते शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस या रेल्वेगाड्या रद्द असणार आहेत. तर, लोकल सेवेचे वेळापत्रकही बदलण्यात आले आहे.
गुरुवार २३ मे पासून रात्री साडे बारानंतर भायखळा ते सीएसएमटी दरम्यान धावणारी लोकल सेवा बंद ठेवली जाणार आहे. ब्लॉक सुरू होण्यापूर्वी सीएसएमटीहून डाऊन धीम्या मार्गावरील रात्री १२.१४ ची कसारा लोकल शेवटची असणार आहे. ब्लॉकनंतरची पहिली सीएसएमटी-कर्जत लोकल पहाटे ४.४७ वाजता सुटेल. रात्री ९.४३ ची कर्जत-सीएसएमटी, रात्री १०.३४ कल्याण-सीएसएमटी शेवटची लोकल असेल.
सीएसएमटी-पुणे प्रगती एक्स्प्रेस (२८ मे ३१ मेपर्यंत रद्द), पुणे- सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस (२८ मे ३१ मेपर्यंत रद्द), पुणे- सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस (३१ मे रोजी), नांदेड- सीएसएमटी तपोवन एक्स्प्रेस (३१ मे रोजी), साईनगर शिर्डी-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस (३१ मे)
लखनऊ-सीएसएमटी पुष्पक एक्स्प्रेस, अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेस, भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस, हावडा-सीएसएमटी, मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस, मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, मंगलोर जंक्शन-सीएसएमटी एक्स्प्रेस, हैदराबाद-सीएसएमटी हुसैन सागर एक्स्प्रेस, होसपेट जंक्शन-सीएसएमटी एक्सप्रेस, साईनगर शिर्डी-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस, हावडा-सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस
सीएसएमटी-चेन्नई सुपरफास्ट मेल, सीएसएमटी-अमृतसर एक्स्प्रेस, सीएसएमटी-वाराणसी महानगरी एक्स्प्रेस, सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस, सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस. तसेच काही गाड्या पनवेल स्थानकावरून सुटणार आहेत.
सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस पनवेल स्टेशनवरून सुटेल आणि मडगाव-सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस पनवेलपर्यंतच येणार आहे. अमरावती-सीएसएमटी एक्सप्रेस ठाणे स्थानकापर्यंत धावणार आहे.