Mumbai megablock : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज रविवारी सुट्टी घालवण्यासाठी जर घराबाहेर पडणार असेल तर ही बातमी वाचा. आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर ब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉक काळात काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या या उशिराने धावणार आहेत. रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज पश्चिम रेल्ववर १० तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉक काळात १८० फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून लोकलच्या ५० फेऱ्या या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज रविवारी, मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप व डाऊन धिम्या मार्गावर ५ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी ११.५ ते ३.५५ या काळात हा ब्लॉक घेतला जाणार आहे. या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील गाड्या या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. तर मुलुंडच्या पुढे या गाड्या पुन्हा धिम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.
हार्बर मार्गिकेव कुर्ला ते वाशीदरम्यान अप व डाऊन दोन्ही मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० दरम्यान ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. या मार्गावरील वाशी, बेलापूर, पनवेल दरम्यान लोकल सेवा पूर्णत: बंद ठेवण्यात आली आहे. तर ब्लॉक काळात हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला व कुर्ला, पनवेल व वाशी दरम्यान विशेष लोकल सेवा चालवली जाणार आहे.
तर अंधेरी ते गोरेगावदरम्यान अप व डाऊन हार्बर मार्गावर नॉन इंटरलॉकिंगचे काम सुरू असल्याने या मार्गावर रविवारी रात्री पासून विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. या मार्गावर रात्री रात्री १२.३० ते सकाळी १०.३० दरम्यान १० तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक काळात अंधेरी व गोरेगावदरम्यान हार्बर मार्गावरील उपनगरीय सेवा बंद ठेवली जाणार आहे