मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  mufti salman azhari : इस्लामचे अभ्यासक मुफ्ती सलमान अजहरींना गुजरात एटीएसकडून अटक, प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी कारवाई

mufti salman azhari : इस्लामचे अभ्यासक मुफ्ती सलमान अजहरींना गुजरात एटीएसकडून अटक, प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी कारवाई

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 05, 2024 06:28 AM IST

islam scholar mufti salman azhari arrested by gujarat ats : गुजरात एटीएसने मोठी कारवाई केली आहे. इस्लामचे अभ्यासक मुफ्ती सलमान अझरींना घाटकोपर मधून अटक करण्यात आली आहे.

gujarat ats arrested islam scholar mufti salman azhari
gujarat ats arrested islam scholar mufti salman azhari

gujarat ats arrested islam scholar mufti salman azhari : घाटकोपर येथून इस्लामचे अभ्यासक मुफ्ती सलमान अजहरी यांना गुजरातच्या एटीएस पथकाने अटक केली आहे. घाटकोपर येथून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना अटक केल्यामुळे संतप्त जमावाने घाटकोपर पोलिस ठण्यासामोर एकत्र येत मोठी घोषणाबाजी केल्याने घटकोपर पोलिस ठण्यासमोर तनावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, जुनागडमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

Panvel Water Supply: पनवेलमधील पाणीपुरवठ्याच्या समस्येवर त्वरित तोडगा काढण्याचे फडणवीसांचे निर्देश

अजहरी यांना अटक केल्यामुळे घाटकोपर येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांची मोठी कुमक घटकोर येथे तैनात करण्यात आली आहे. मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी घाटकोपरमध्ये हजर आहे. घाटकोपर येथे हजारोंच्या मुस्लिम जमावाने एकत्र येऊन आंदोलन केले.

मिळाळलेल्या माहितीनुसार ३१ जानेवारीला त्यांनी जुनागड येथे व्यसनमुक्तीवर जनजागृती करण्यासाठी भाषण करण्याची परवानगी मागितली होती. मात्र, त्यांनी या ठिकाणी भडकाऊ आणि दोन समाजात तेढ निर्माण होईल असे भाषण केले. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ देखील व्हायरल झळा आहे. त्यामुळे गुजरातच्या एटीएसच्या पथकाने अजहरींवर गुन्हा दाखल करत त्यांना घाटकोपर येथून अटक केली. गुजरात एटीएसने या प्रकरणी अजहरी, स्थानिक आयोजक मोहम्मद युसूफ मालेक आणि अझीम हबीब ओडेदारासह, कलम १५३B (विविध धार्मिक गटांमधील शत्रुत्व वाढवणे) आणि ५०५(२) (सार्वजनिक क्षोभासाठी अनुकूल विधाने करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी कार्यक्रमाच्या दोन आयोजक मलेक आणि हबीब यांना देखील अटक केली आहे.

Viral Video: माहीम स्थानकाजवळील रेल्वे ट्रॅकवर जेवण बनवतानाचा व्हिडिओ व्हायरल!

गुजरात एटीएसचे एक पथक दुपारी घाटकोपर येथे आले. त्यांना अटक करत त्यांनी घटकोर येथील पोलिस ठाण्यात नेले. ही बातमी त्यांच्या समर्थकांना समजताच मोठा जमाव ठण्यासामोर जमून घोषणाबाजी करू लागला.

दरम्यान, अजहरी यांचे वकील म्हणाले, तब्बल ४० ते ५० पोलिस सध्या वेशात अजहरी यांच्या घरी आले. अजहरी यांना बोलवण्यात आले. थोड्या वेळाने अजहरी यांनी पुढे येत पथकाला आत घेतले. यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली. मुफ्ती सलमान अजहरी म्हणाले, मला तुम्ही पोलीस ठाण्यात घेऊन चला, मला नोटीस द्या मी तुम्हाला सहकार्य करतो. त्यांना अटक करण्यात आल्याच्या घटनेचा त्यांच्या समर्थकांनी विरोध केल्या असून या विरोधात थेट घाटकोपर पोलिस ठाण्यासमोर एकत्र येत घोषणाबाजी करण्यात आली आहे.

WhatsApp channel

विभाग