Mumbai Borivali Fire News: मुंबईतील बोरिवली येथील एका पार्किंगला शुक्रवारी संध्याकाळी मोठी आग लागली. या आगीत जवळपास ३० गाड्या जळून खाक झाल्याची माहिती आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही आग कशामुळे लागली, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मुंबईतील बोरिवली परिसरात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांना संध्याकाळी अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या आगीत जवळपास ३० गाड्या जळून खाक झाल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेने मुंबई अग्निशमन दलाच्या हवाल्याने दिली आहे.
उत्तर दिल्लीतील अलीपूर भागातील एका कारखान्याला गुरुवारी सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला. तर, चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली. मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. मृतांमध्ये एक महिलेचा समावेश आहे. दयाळ मार्केटजवळील नेहरू एन्क्लेव्हमधील एका पेंट फॅक्टरीला गुरुवारी सायंकाळी ५ वाजून २५ मिनिटांनी आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या २२ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या, दिल्ली अग्निशमन दलाचे संचालक अतुल गर्ग यांनी दिली.
संबंधित बातम्या