मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Marathon 2023 : आमची मॅरेथॉन अवघड होती, ३० वर्षांच्या लढाईनंतर मुख्यमंत्री झालो -शिंदे

Mumbai Marathon 2023 : आमची मॅरेथॉन अवघड होती, ३० वर्षांच्या लढाईनंतर मुख्यमंत्री झालो -शिंदे

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 10, 2022 11:27 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'आम्ही एक मोठी शर्यत जिंकून आलो आहे. मुंबई व्हाया सुरत व्हाया गुवाहाटी. आमची मॅरेथॉन अवघड होती. पण आम्ही मॅरेथॉन पार केली आणि जिंकलो.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm eknath shinde) यांनी मुंबई मॅरेथ़ॉन २०२३ (Mumbai marathon 2023) ची घोषणा केली. त्यावेळी ते म्हणाले की, मॅरेथॉनवाले पळतात, पण आम्ही देखील पळतो आणि पळवतो. पण तुम्हाला पदक मिळते. आम्हाला पहिलं येऊन पदक मिळत नाही. माझी लढाई अवघड होती, ३० वर्ष धावल्यानंतर मुख्यमंत्री झालो.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm eknath shinde) म्हणाले मुंबई मॅरेथॉन (Mumbai marathon 2023) ही आशियातील प्रतिष्ठित मॅरेथॉन स्पर्धा मानली जाते. यंदाचं हे १८ वं वर्ष असून यंदाची मॅरेथॅान स्पर्धा १५ जानेवारी २०२३ रोजी होणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केलं आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस ही उपस्थित होते.

मुंबई व्हाया सुरत व्हाया गुवाहाटी आमची मॅरेथॉन -

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'आम्ही एक मोठी शर्यत जिंकून आलो आहे. मुंबई व्हाया सुरत व्हाया गुवाहाटी. आमची मॅरेथॉन अवघड होती. पण आम्ही मॅरेथॉन पार केली आणि जिंकलो. मुंबई मॅरेथॉनची वाट जगातील सगळे लोक पाहत असतात. मागील दोन वर्षात कोरोनामुळे मॅरेथॉनचे आयोजन करता आले नाही.

मुंबई मॅरेथॉनसाठी टाटांचं मोठं योगदान -

मुंख्यमंत्री म्हणाले यंदा जगातील सगळ्यात मोठी मॅरेथॉन मुंबईत होत आहे. काही दिवसांपूर्वी उद्योजक रतन टाटा यांना मी भेटलो,ते सरकारसोबत हातात हात घालून राज्य पुढे नेऊ म्हणाले. त्यांचं योगदान टाटा मुंबई मॅरथॉनमध्ये खूप मोठं आहे. या मॅरेथॉनसाठी जगभरातील इच्छुकांसाठी नोंदणी आज सुरू होत आहे',असेही शिंदे म्हणाले.

 

IPL_Entry_Point

विभाग