Mumbai Marathon News : मुंबईत रविवारी टाटा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉनमध्ये तब्बल ६२ हजार स्पर्धकांनी भाग घेतला. मात्र, यातील बऱ्याच स्पर्धकांना खराब हवामानामुळे त्रास झाला. मुंबईतील हवेची गुणवत्ता खराब असल्याने त्यांना श्वसनाचा त्रास झाला. काही धावपटू चक्कर येऊन पडले. यातील काही जणांना आयसीयूत दाखल करण्यात आलं आहे. तर दोघे जण व्हेंटीलेटरवर आहेत. काल मुंबईत सीएसएमटीजवळ हवेच्या गुणवत्ता निर्देशांक हा १५० एक्युआय एवढा होता.
मुंबईत रविवारी जल्लोषात टाटा मॅरेथॉनला सुरुवात झाली. मोठ्या उत्साहात धावपटूंनी सकाळी धावण्यास सुरुवात केली. पहाटे ५ वाजता पाच वाजता या स्पर्धेला सुरुवात झाली. उन्हाचा तडाखा आणि वायू प्रदूषण असताना देखील दक्षिण मुंबईतील रस्त्यावरून अनेक धावपुटू धावले. मात्र, त्यांना प्रदूषणामुळे मनस्ताप सहन करावा लागला. वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करणारे अनुभवी खेळाडू असोत किंवा सामाजिक कार्य म्हणून धावणारे खेळाडू असोत अनेकांना प्रदूषणामुळे त्रास झाला. यंदाच्या मॅरेथॉनमध्ये ५९,९६७ धावपटू मैदानात तर ५,३५३ धावपटू व्हर्च्युअल पद्धतीने सहभागी झाले होते.
अनेक धावपटूंना उष्णता आणि आर्द्रतेचा सामना करावा लागला. कुलाबा येथे ८३ टक्के आर्द्रतेसह तापमान ३३ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान होते, तर सांताक्रूझ येथे ७७ टक्के आर्द्रतेसह ३४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मॅरेथॉनमधील ६२ हजार स्पर्धकांपैकी २०१८ जणांना त्रास जणावू लागला. त्यांची प्रकृती ही खराब झाली. यातील २६ जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर तर दोन जणांची प्रकृती अत्यवस्थ आहेत. यातील १५ जणांवर अतिदकक्षता विभागात उपचार सुरू आहेत रविवारी संध्याकाळी १६ जणांना घरी सोडण्यात आले. तर गेल्या वर्षी मॅरेथॉनदरम्यान प्रकृती बिघडून २ धावपटूंचा मृत्यू झाला होता.
बहुतेक स्पर्धकांना स्नायू दुखणे, पाय दुखणे या सारखे त्रास झाले. या स्पर्धेसाठी एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट आणि टाटा मुंबई मॅरेथॉन २०२५ चे वैद्यकीय संचालक डॉ संतोष कुमार डोरा यांच्या मार्फत १५ मदत केंद्रे, तीन आधार शिबिरे स्थापन करण्यात आली होती. तर डॉक्टर, परिचारिका आणि फिजिओथेरपिस्टसह ६०० स्वयंसेवक तैनात केले होते. धावणाऱ्यांना दोघांना हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती असून त्यांना तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आलं. कथिरावन (वय ३९ ) व हार्दिक शाह (वय अज्ञात), अशी त्यांची नावे असून हे दोघे व्हेंटिलेटरवर आहेत. तर विजय आनंद (वय ५२) यांना देखील हृदयविकाराचा झटका आला होता, त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
बेंगळुरूहून आलेल्या ७० वर्षीय अनुभवी धावपटू आदिशेहा म्हणाल्या, 'नुकत्याच झालेल्या बेंगळुरूच्या मॅरेथॉनमध्ये मी ४ तास १० मिनिटांची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली. पण इथल्या आर्द्रतेमुळे माझा वेग मंदावला. पहाटे चार वाजता शर्यत सुरू केल्यास कदाचित हे कमी झाले असते.
संबंधित बातम्या