Mumbai Acid Attack: विवाहबाह्य संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीवर अ‍ॅसिड फेकलं, मुंबईतील मालवणी येथील घटना-mumbai man throws acid on wifes face in malvani after she discovers his affair ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Acid Attack: विवाहबाह्य संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीवर अ‍ॅसिड फेकलं, मुंबईतील मालवणी येथील घटना

Mumbai Acid Attack: विवाहबाह्य संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीवर अ‍ॅसिड फेकलं, मुंबईतील मालवणी येथील घटना

Sep 27, 2024 06:47 PM IST

Man Throws Acid On Wife In Mumbai: मुंबईतील मालवणी परिसरात विवाहबाह्य संबंधाला विरोध केला म्हणून पतीने पत्नीवर अ‍ॅसिड फेकल्याची घटना घडली.

मुंबई: मालवणी परिसरात पत्नीवर अ‍ॅसिड हल्ला
मुंबई: मालवणी परिसरात पत्नीवर अ‍ॅसिड हल्ला

Mumbai Man Throws Acid On Wife: मुंबईतील मालवणी परिसरात विवाहबाह्य संबंधाला विरोध केला म्हणून एका व्यक्तीने पत्नीवर अ‍ॅसिड हल्ला केला. या घटनेत पीडित महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहे. महिलेच्या फिर्यादीवरून च्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने २०१९ मध्ये आरोपीशी प्रेम विवाह केला होता. लग्नानंतर आपला पती बेरोजगार असून त्याला अमली पदार्थांचे व्यसन असल्याचे महिलेला समजले. महिलेने पतीच्या विवाहबाह्य संबंधाला विरोध केला आणि घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. परंतु, पत्नीच्या निर्णयामुळे संतापलेल्या पतीने तिच्यासोबत भांडणे सुरू केली. रोजच्या भांडणांना वैतागून महिला तिच्या माहेरी निघून गेली. दरम्यान, बुधवारी पीडिता आपल्या आई वडिलांच्या घरी असताना आरोपीने तिथे जाऊन तिच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले.

या हल्ल्यात पीडित महिला गंभीर जखमी जखमी झाली. पीडिताला ताबडतोब कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडिताने दिलेल्या तक्रारीनुसार तिच्या पतीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम १२४ (२), ३११, ३३३ आणि ३५२ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर आरोपी पती फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

नाशिक: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील मोठामाळ येथे चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्याप्रकरणी पतीला अटक केली. सिताराम राऊत (वय, ३०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने पत्नी कला राऊत (वय, २६) हिचा राहत्या घरी लोखंडी पावडीने मानेवर वार करत हत्या केली. मृत महिलेची आई उर्मिला मनसू गावित (वय, ४४) हिने आरोपीविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता मयत कला हिचे विवाहबाह्य संबंध असल्याचे त्याला संशय होता. यामुळे त्यांच्यात नेहमी वाद होत असे. याच मुद्द्यावरून कला आणि आरोपी यांच्यात १९ सप्टेंबर रोजी कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर हे भांडण मिटण्याऐवजी आणखी पेटले. त्यावेळी आरोपीने रागाच्या भरात कला यांच्यावर लोखंडी पावडीने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कला यांचा उपचाराआधीच मृत्यू झाला.

 

Whats_app_banner
विभाग