Mumbai: भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या, मुंबईतील सायन येथील घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai: भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या, मुंबईतील सायन येथील घटना

Mumbai: भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या, मुंबईतील सायन येथील घटना

Nov 01, 2024 04:46 PM IST

Mumbai Man Stabbed To Death In Sion Koliwada: मुंबईतील सायन कोळीवाडा परिसरात भांडण मिटण्यासाठी मध्यस्ती करायला गेलेल्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली.

भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या
भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या

Mumbai Murder News: मुंबईतील सायन कोळीवाडा परिसरात शुक्रवारी (०१ नोव्हेंबर २०२४) पहाटे धक्कादायक घटना घडली. भांडण मिटण्यासाठी गेलेल्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. याप्रकरणी अँटॉप हिल पोलिसांनी ५ जणांना अटक केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

विवेक गुप्ता (वय, २२) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रस्त्यावर गोंधळ घालत असताना त्यांच्यात आपआपसात वाद सुरू झाला. त्यांच्यातील वाद मिटवण्यासाठी गुप्ता यांनी मध्यस्ती केली. मात्र, हस्तक्षेप केल्याचा राग मनात धरून आरोपींमधील एका व्यक्तीने विवेकवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात विवेक गंभीर जखमी झाला. त्याला त्वरीत सायन रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अँटॉप हिल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील मुख्य आरोपी कार्तिक आर मोहन देवेंद्र चा परिसरात राहणाऱ्या मोनूशी वाद झाला. या दोघांमधील वाद मिटवण्यासाठी मयत विवेकने मध्यस्थी केली. मात्र, यामुळे संतापलेल्या कार्तिकने विवेकवर हल्ला केला. या हल्ल्यात विवेकच्या पोटावर, पाटीवर आणि हातावर गंभीर जखमा झाल्या. त्याला ताबडतोब सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारदरम्यान विवेकचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुख्य आरोपीसह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात कलम ४९०/२४, १८९(२), १८९(४), १९१ (२), १९१ (३), १९० , १०३ (३), ११८ (१), ३५२, ३५१ (२), सेक्शन ३१ (१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्तिक आर मोहन देवेंद्र, कार्तिक कुमार देवेंद्र, विकी मुत्तु देवेंद्र, मिनीअप्पण रवी देवेंद्र आणि कार्तिक आर मोगनची पत्नी अशा पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

घरकुल योजनेच्या वादातून थोरल्यानं धाकट्याला संपवलं

पालघरमध्ये घरकुल योजनेच्या वादातून एका व्यक्तीने धाकट्या भावावर कोयत्याने वार करून हत्या केल्याची घटना बुधवारी (३० ऑक्टोबर २०२४) घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चंद्रकांत जीतू पाटील (वय, ३५) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, सतीश जितू पाटील (वय ४५) असे आरोपीचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर