Mumbai Kandivali Soda Seller News: मुंबईच्या कांदिवली परिसरातील सोडा विक्रेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. एका तरुणाच्या डोळ्याला इजा केल्याचा सोडा विक्रेत्यावर आरोप आहे. आरोपीने सोड्याची बाटली उघडली असता, तिचे झाकण उडून तरुणाच्या डोळ्यावर आदळले. त्यामुळे तरुणाला दुखापत झाली असून त्याची दृष्टी कमी झाल्याची सांगण्यात आले आहे.
सिद्धेश सावंत (वय, २६), असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, विश्वनाथ सिंह असे अटक करण्यात आलेल्या सोडा विक्रेत्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धेश सावंत दुबईतील एका फायनान्स कंपनीत काम करतो आणि आई- वडिलांना भेटण्यासाठी भारतात आला, जे खार पश्चिम येथील खार दांडा येथील रहिवाशी आहेत. दरम्यान, ६ जानेवारी २०२३ रोजी सिद्धेश हा त्याच्या मित्रांसोबत कांदिवली पश्चिम येथे गेला, तिथे त्यांनी विश्वनाथ सिंह याच्याकडून सोड्याच्या तीन बॉटल खरेदी केल्या. मात्र, तिसरी बॉटल उघडत असताना सिद्धेशच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली.
यानंतर सावंतच्या मित्रांनी त्याला तातडीने कांदिवली पश्चिम येथील हिमांशू आय केअर सेंटरमध्ये नेले, जिथे डॉ. रागिणी देसाई यांनी प्राथमिक उपचार केले. त्यानंतर वेदना वाढत असल्याने सावंत यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात पुढील उपचार घेतले. सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर त्याची दृष्टी कमी झाली. डॉक्टरांनी मला पाच दिवसांच्या उपचारांचा सल्ला दिला. दुबईला विमान असूनही मला प्रवास करू शकलो नाही. मी संबंधित सोडा विक्रेत्याविरोधात तक्रार दाखल केली, ज्यामुळे त्याला अटक करण्यात आली.
याप्रकरणी सावंत यांनी कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३३७ गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी विश्वनाथ सिंहला अटक करण्यात आली, अशी माहिती कांदिवली पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ पोलिसांनी माहिती दिली.