Mumbai: घराजवळ कचरा टाकण्यावरून झालेल्या वादातून शेजाऱ्यांवर कोयत्यानं वार, मुंबईतील धक्कादायक घटना-mumbai man arrested for attacking mother son duo over garbage dispute in dadar worli koliwada ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai: घराजवळ कचरा टाकण्यावरून झालेल्या वादातून शेजाऱ्यांवर कोयत्यानं वार, मुंबईतील धक्कादायक घटना

Mumbai: घराजवळ कचरा टाकण्यावरून झालेल्या वादातून शेजाऱ्यांवर कोयत्यानं वार, मुंबईतील धक्कादायक घटना

Aug 17, 2024 05:19 PM IST

Mumbai Man Attacking Mother and Son: मुंबईतील वरळी कोळीवाड्यात घराजवळ कचरा टाकण्यावरून झालेल्या वादातून शेजाऱ्याने बिबट्याने केलेल्या हल्ल्यात आई- मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली.

घराजवळ कचरा टाकण्यावरून झालेल्या वादातून शेजाऱ्यांवर कोयत्यानं वार
घराजवळ कचरा टाकण्यावरून झालेल्या वादातून शेजाऱ्यांवर कोयत्यानं वार

Mumbai News: मुंबईतील वरळी कोळीवाड्यात घराजवळ कचरा टाकण्यावरून झालेल्या वादातून शेजारची महिला आणि तिच्या मुलावर कोयत्या वार केल्याची घटना घडली. या घटनेत संबंधित महिला आणि तिचा मुलगा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलामांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. ही घटना गुरुवारी संध्याकाळी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, नविता वैद्य (वय, ६४) आणि त्यांचा मुलगा रोहन वैद्य (वय, ३९) असे हल्ल्यात जखमी झालेल्या माय-लेकाची नावे आहेत. तर, अशोक पाटील (वय, ६९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान, नविता आणि रोहन यांनी शेजारी राहणाऱ्या आरोपीला त्यांच्या घराजवळ कचरा टाकण्यास विरोध केला. मात्र, यामुळे आरोपीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने घरातून कोयता आणला. त्यावेळी रोहनने आरोपीला कोयता घरात ठेवण्यास सांगितले. मात्र, आरोपीने रागाच्या भरात त्याच्यावर वार केले. त्यावेळी नवीता यांनी मध्यस्ती केली असता आरोपीने त्यांच्यावरही कोयत्याने हल्ला केला. रोहन आणि त्याचे वडील जयवंत (वय, ७५) यांनी आरोपीला पकडून घरात बंदिस्त केले. या घटनेत महिलेच्या मानेला आणि हाताला जखम झाली असून मुलाच्या हाताला जखम झाली आहे, अशी माहिती दादर पोलीस ठाण्यातील एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.

या दोघांनाही मुंबई सेंट्रल येथील बीवायएल नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पाटील यांना अटक करण्यात आली आहे. आई-मुलावर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेला कोयता पोलिसांनी जप्त केला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०९ (खुनाचा प्रयत्न), ११८ (१) (गंभीर दुखापत करणे) आणि ११५ (स्वेच्छेने इजा पोहोचविणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

दौंड: दाजीनं मेव्हण्यावर केलं कोयत्यानं वार

दौंड तालुक्यातील खामगाव येथे काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने मेहुण्यावर कोत्याने हल्ला केला. या हल्ल्यात मेहुण्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ३ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली.सुरज राहुल भुजबळ असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, अमोल बहिरट असे आरोपीचे नाव आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सूरजने बहिणींना घरी आणले म्हणून चिडलेल्या बहिरटने त्याची हत्या केली. वर्दळीच्या चौकात असलेल्या दुकानात घुसून आरोपीने सूरजवर कोयत्याने १५ ते १६ वार केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या घटनेचा तपास करीत आहेत.

 

विभाग