Worli Rape: नोकरीचे आमिष दाखवत तरुणीला जाळ्यात अडकवलं, भेटायला बोलवून बलात्कार; वरळीतील घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Worli Rape: नोकरीचे आमिष दाखवत तरुणीला जाळ्यात अडकवलं, भेटायला बोलवून बलात्कार; वरळीतील घटना

Worli Rape: नोकरीचे आमिष दाखवत तरुणीला जाळ्यात अडकवलं, भेटायला बोलवून बलात्कार; वरळीतील घटना

Updated May 18, 2024 07:11 PM IST

Man Rapes 24 Year Old Woman In Worli: मुंबईच्या वरळीत तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका ५० वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली.

मुंबईत नोकरीचे आमिष दाखवून २४ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली.
मुंबईत नोकरीचे आमिष दाखवून २४ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली.

Mumbai Rape News: २४ वर्षीय तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना मुंबईच्या वरळी परिसरात गुरुवारी (१६ मे २०२४) रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी वरळी पोलिसांनी एका ५० वर्षीय व्यक्तीला अटक असून पुढील चौकशीला सुरुवात केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

जोसेफ जेम्स (वय, ५०) असे अटक करण्यात आरोपीचे नाव आहे. वरळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील रहिवासी असलेल्या पीडित महिलेने नोकरीच्या शोधात तिच्या एका पुरुष मित्राची मदत घेतली. पीडित महिलेच्या मैत्रिणीने तिला जोसेफचा मोबाईल नंबर दिला आणि त्याच्याशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. यानंतर पीडिताच्या मित्राने तिला आरोपी जोसेफने खार येथे भेटायला बोलावले आहे, असे सांगितले. पीडिता ताबडतोब टॅक्सीने खारला पोहोचली, जिथे जोसेफ आणि तिचा मित्र होते. यानंतर तिघेही एका हॉटेलमध्ये आणि दारू पिऊन मध्यरात्रीच्या सुमारास घराकडे निघाले.

पीडिता खार रेल्वे स्थानकाच्या दिशेने निघाली असता जोसेफने तिला आता कोणतीही लोकल उपलब्ध नसल्याचे सांगितले. तसेच आपल्या कारने तिला घरी सोडतो असे सांगितले. पहाटे तीनच्या सुमारास ती त्याच्या कारमध्ये झोपली असताना जोसेफने तिचा विनयभंग सुरू केला. तिने विरोध केल्यावर त्याने जबरदस्तीने तिचे कपडे काढून तिच्यावर बलात्कार केला. तसेच या घटनेची कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र, पीडिताने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या एका वकील मित्राला सांगितला. त्याने पीडिताला ताबडतोब पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास सांगितले. यानंतर पीडिताने जवळचे पोलीस ठाणे गाठून पोलिसांत तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीवरून वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

पुणे: फिरायला नेण्याच्या बहाण्याने २ अल्पवयीन तरुणीवर बलात्कार

पुण्यात खेड परिसरात दोन अल्पवयीन मुलींना फिरायला नेण्याच्या बहाण्याने एका लॉजवर नेऊन त्यांच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली. ही घटना शुक्रवारी घडली. अजय भिकेन दौड (वय, २९), श्रीराम संतोष होले आणि (वय,२३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी राजगुरुनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर