मुंबईतील साकीनाका परिसरातील वाजिद अली कंपाऊंडमध्ये भीषण आग; थरारक घटनेचा व्हिडिओ समोर
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबईतील साकीनाका परिसरातील वाजिद अली कंपाऊंडमध्ये भीषण आग; थरारक घटनेचा व्हिडिओ समोर

मुंबईतील साकीनाका परिसरातील वाजिद अली कंपाऊंडमध्ये भीषण आग; थरारक घटनेचा व्हिडिओ समोर

Dec 28, 2024 09:50 AM IST

Mumbai Fire: मुंबईतील साकीनाका परिसरातील वाजिद अली कंपाऊंडमध्ये भीषण आग लागल्याची घटना आज घडली.

मुंबईतील साकीनाका परिसरातील वाजिद अली कंपाऊंडमध्ये भीषण आग
मुंबईतील साकीनाका परिसरातील वाजिद अली कंपाऊंडमध्ये भीषण आग

Mumbai Wajid Ali Compound Fire News: मुंबई कुर्ला पश्चिमेतील साकीनाका परिसरातील खैरानी रोडवरील वाजिद अली कंपाऊंडमध्ये शुक्रवारी (२८ डिसेंबर २०२४) सकाळी भीषण आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. या आगीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मुंबईतील साकीनाका परिसरात शनिवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, वाजिद अली कंपाऊंडमधील गोदामांना अचानक भीषण आग लागली. भंगार साहित्य व प्लास्टिक असल्याने आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर