fake mhada website : म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज भरताय? सावधान! बनावट वेबसाईट बनवून होतेय लाखोंची फसवणूक-mumbai lottery cyber fraud in mhada beware from fake website before paying money for online application ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  fake mhada website : म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज भरताय? सावधान! बनावट वेबसाईट बनवून होतेय लाखोंची फसवणूक

fake mhada website : म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज भरताय? सावधान! बनावट वेबसाईट बनवून होतेय लाखोंची फसवणूक

Aug 14, 2024 08:58 AM IST

fake mhada website : म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्जकरताना सावधगिरी बागळणे आवश्यक आहे.तुम्हीनोंदणी वअर्ज करत असलेली लिंक ही खरी किंवा अधिकृत आहे का? हे तपासूनघेणे आवश्यक आहे.

म्हाडा लॉटरी
म्हाडा लॉटरी

MHADA Fake Website : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून नुकतीच २०३० परवडणाऱ्या घरांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. ९ ऑगस्टपासून म्हाडा घरांच्या लॉटरीसाठी ऑनलाईनअर्ज भरायला सुरुवात झाली आहे. तुम्ही या घरांसाठी अर्ज करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. म्हाडा लॉटरीच्या नावाखाली लोकांची सायबर फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.सायबर चोरट्यांनी म्हाडाची हुबेहुब वेबसाईट तयार करुनलोकांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी मुंबई सायबर सेलकडे तक्रार दाखल केली असून याचा तपास केली जात आहे.

मुंबई म्हाडाकडून २०३० घरांसाठी म्हाडाने लॉटरी जाहीर केली आहे. ९ ऑगस्टपासून म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. मात्र ऑनलाईन अर्ज करताना सावधगिरी बागळणे आवश्यक आहे. तुम्ही नोंदणी  वअर्ज करत असलेली लिंक ही खरी किंवा अधिकृत आहे का? हे तपासूनघेणे आवश्यक आहे.

म्हाडाकडून मुंबईतील गोरेगाव, अँटॉप हिल, कोपरी पवई, कन्नमवार नगर आणि मालाड या गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटांतील घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. १३ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता सोडत काढली जाणार आहे. मुंबईत हक्काच्या घरांचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. मात्र घराचे स्वप्न पाहणाऱ्यांची फसवणूक होत असल्याचे समोर आलं आहे.

म्हाडाच्या बनावट संकेतस्थळाच्या माध्यमातून फसवणूक -
म्हाडाने नोंदणीसाठी जारी केलेल्या अधिकृत संकेतस्थळाची (MHADA Website) हुबेहुब कॉपी करुन घरांसाठी अर्ज करणाऱ्या लोकांची फसवणूक केली जात आहे. Mhada.Orgया बोगस संकेतस्थळावरुन चार नागरिकांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाशी साधर्म्य असलेल्या या बनावट संकेतस्थळावर फोटो आणि डिझाईन तसेच रंगसंगती हुबेहुबे ओरिजनल वेबसाईट प्रमाणे बनवण्यात आली आहे. त्यामुळे लोकांची फसवणूक होत आहे. या वेबसाईटवर सहा लाख रुपये भरा आणि२९लाख रुपयात घर मिळवा अशी जाहीरात करण्यात आली आहे. फसवणूक झालेल्या लोकांनी आयटी विभागाने सायबर सेलकडे तक्रार केली आहे. वास्तविक म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर पैसे भरण्यासाठी कोणताही पर्याय देण्यात आलेला नाही. पण बनावट वेबसाईटवर पेमेंट ऑप्शन देण्यात आला आहे. लोकं या पेमेंट ऑप्शनवर क्लिक करुन पैसे भरत असल्याचे समोर आले आहे.

 

खरी वेबसाईट कोणती?

घरांसाठी अर्ज करताना लोकांनी बनावट वेबसाईटपासून सावध राहण्याचे आवाहन म्हाडाच्या आयटी विभागाने केलं आहे. त्याचबरोबर म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार आणि प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणाशीही व्यवहार करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. mhada.gov.in  याअधिकृत संकेतस्थळावरच अर्ज नोंदणी, अर्ज भरणा आणि अनामत रक्कम जमा केली जात आहे. अन्य कोणत्याही वेबसाईटवर पैसे भरू नये असे सांगतले जात आहे.

 

विभाग