Mumbai Local Updates: कर्नाक बंदर उड्डाणपुलाच्या तुळया उभारण्यासाठी मध्य रेल्वेने शनिवारी विशेष मेगाब्लॉकची घोषणा केली. हा मेगाब्लॉक शनिवारी (२० जुलै २०२४) १२.३० पासून ते रविवारी (२१ जुलै २०२४) पहाटे ४.३० वाजेपर्यंत असेल. या मेगाब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून भायखळा आणि वडाळाच्या दिशेने धावणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय, अनेक एक्स्प्रेस गाड्या दादर स्थानकापर्यंतच धावतील.
मध्य रेल्वेने कर्नाक बंदर उड्डाणपुलाच्या तुळया उभारण्याचे काम हाती घेतले. विशेष मेगाब्लॉकदरम्यान, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील भायखळा ते सीएसएमटी आणि हार्बर मार्गावर वडाळा रोड ते सीएसएमटी दरम्यानची लोकल सेवा रद्द करण्यात आली. मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन दिशेकडील लोकल भायखळा, परळ, ठाणे आणि कल्याणपर्यंत धावतील. हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन लोकल वडाळा रोड स्थानकापर्यंत चालवण्यात येतील. तसेच वडाळ्याहून पनवेलच्या दिशेने धावतील.
- हावडा ते सीएसएमटी अतिजलद एक्स्प्रेस
- अमृतसर ते सीएसएमटी एक्स्प्रेस
- मडगाव ते सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस
- मडगाव ते सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस
- भुवनेश्वर ते सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस
- हावडा ते सीएसएमटी मेल
संबंधित बातम्या