Mumbai Local Update : तांत्रिक बिघडामुळे मुंबईचया लोकल सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक गाड्या या उशिराने धावत आहेत, त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. पश्चिम रेल्वेवर गर्डरदुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने या मार्गावरील लोकल उशिरा धावत आहेत. तसेच पुढील काही दिवस लोकल उशिराने धावतील अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पाडवा व भाऊबीज निमित्त जर तुम्ही घराबाहेर पडण्याचे नियोजन करत असाल तर लोकलचे वेळापत्रक पाहून घराबाहेर पडावे लागणार आहे.
रेल्वेने गर्डर दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कामामुळे लोकल सेवेवर परिमाण झाला आहे. अनेक लोकल गाड्या या उशिराने धावत आहे. मध्यम व पश्चिम रेल्वे मार्गावरील गाड्या या १५ते २० मिनिटं उशिराने धावत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार कल्याण ते सीएसएमटी ट्रेन १६ ते २० तर स्लो लोकल ६ ते १० मिनिटं उशिराने आहेत. सीएसएमटी ते कल्याण मार्गावर लोकल वेळेत धावत आहेत. तर विरार चर्चगेट ट्रेन फास्ट ट्रेन ५ मिनिटं उशिराने तर स्लो ट्रेन १० मिनिटं उशिराने आहेत. चर्चगेट ते विरार ट्रेन वेळेत धावत आहेत.
आज सकाळीच लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने सलग सुट्ट्यांमुळे मुंबईत फिरायला आलेले तसेच भाऊबीज आणि पाडव्यानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची गैरसोय झाली.