मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Railway Deaths: जानेवारीपासून एप्रिलपर्यंत एकूण ७८९ लोकांचा रेल्वे अपघातात मृत्यू

Railway Deaths: जानेवारीपासून एप्रिलपर्यंत एकूण ७८९ लोकांचा रेल्वे अपघातात मृत्यू

May 27, 2024 11:04 AM IST

Railway Deaths In Mumbai: मध्य आणि पश्चिम रेल्वेवर अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी अपघाताचे प्रमाण जास्त आहे.

जानेवारीपासून एप्रिलपर्यंत एकूण ७८९ लोकांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे.
जानेवारीपासून एप्रिलपर्यंत एकूण ७८९ लोकांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे.

Mumbai News: मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या अपघातात मोठी वाढ झाली. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर गेल्या चार महिन्यात (जानेवारी ते एप्रिलपर्यंत) ७८९ जणांच्या मृत्युची नोंद झाली. यातील २४४ जणांचा मृत्यू रुळ ओलांडताना झालेल्या रेल्वे अपघातामुळे झाला. १३६ जणांचा प्रवास डब्ब्यातून खाली पडल्याने आणि दोन जणांचा रेल्वेच्या खांबावर आदळल्याने मृत्यू झाला. तीन प्रवाशांचा प्लेटफॉर्ट आणि ट्रेनमधून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर, एकाचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाला. याशिवाय, ३९ जणांनी रेल्वे समोर उडी घेत आत्महत्या केली. तर, २१९ जणांचा नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाला आणि १५ जणांचा इतर कारणांमुळे झाला. ११० लोकांचे मृतदेह बेवारस होते.

ट्रेंडिंग न्यूज

२०२३ मध्ये मध्य रेल्वेवर गेल्यावर्षी एकूण १ हजार ६५० लोकांनी आपला जीव गमवावा लागला. यातील ७८२ जणांचा रुळ ओलांडताना मृत्यू झाला. तर, ४३१ जणांचा डब्ब्यातून घसरून आणि एकाचा रेल्वेच्या खांबाला धडकल्याने मृत्यू झाला. रुळ ओलांडताना ७८२ जणांचा मृत्यू झाला, ४३१ डबे घसरून रेल्वेच्या खांबाला धडकल्याने एकाचा मृत्यू झाला. सात प्रवासी प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधून पडले. नऊ जणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ८२ जणांनी ट्रॅकवर आत्महत्या केली. ३१० जणांचा नैसर्गिक कारणांमुळे आणि १७ जणांचा मृत्यू इतर कारणांमुळे झाला. ११ जणांच्या मृत्युची कारणे अस्पष्ट आहेत. तर, ४३५ मृतदेहाची ओळख पटली नाही.

यावर्षी पश्चिम रेल्वेवर ३०४ मृत्युची नोंद

जानेवारी ते एप्रिलपर्यंत पश्चिम रेल्वेवर एकूण ३०४ मृत्युची नोंद करण्यात आली. यापैकी १६२ जणांचा रेल्वे रूळ ओलांडताना मृत्यू झाला. ६५ जण रेल्वेतून पडले आणि एका व्यक्तीचा विजेचा धक्क्याने मृत्यू झाला. याव्यतिरिक्त, १० लोकांनी ट्रॅकवर आत्महत्या केल्या. ५९ जणांचा नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाला आणि सात जणांचा इतर कारणांमुळे मृत्यू झाला. या मृत्यूंपैकी ९७ मृतदेह लावलेले आहेत.

पश्चिम रेल्वेवर गेल्यावर्षी रेल्वे अपघातात ९४० जणांचा मृत्यू

२०२३ मध्ये पश्चिम रेल्वेमध्ये ९४० मृत्यूची नोंद झाली. यामध्ये रुळ ओलांडताना प्राण गमावलेले- ४९५, ट्रेनमधून पडून मृत्यू झालेले- १५९, तीन जण रेल्वेच्या खांबावर आदळून मृत्यूमुखी पडले आणि तिघांचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाला. पाच व्यक्तींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ३९ जणांनी आत्महत्या केली, २१९ जणांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला आणि १५ जणांचा मृत्यू इतर कारणांमुळे झाला. नऊ जणांच्या मृत्यूची कारणे अद्याप अस्पष्ट आहेत. एकूण मृत्यूंपैकी २८३ जणांचे मृतदेह बेवारस आहेत.

एका रेल्वे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, मृतदेह १४ दिवस सरकारी रुग्णालयात ठेवला जातो. या कालावधीत, नातेवाईक मृतदेहांवर दावा करू शकतात. कोणी पुढे न आल्यास पोलीस अंत्यसंस्कार करतात. पोलीस मृत व्यक्तीचा धर्म त्यांनी परिधान केलेल्या कोणत्याही खुणा किंवा दागिन्यांवरून ठरवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यानुसार अंतिम संस्कार करतात, असे ते म्हणाले.

टी-२० वर्ल्डकप २०२४