मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Mumbai Local Train Wheel Catches Fire Near Asangaon

Mumbai local train: लोकल ट्रेनच्या चाकाला आग लागली, प्रवाशांनी घाबरून मारल्या गाडीतून उड्या

Mumbai local train
Mumbai local train
Ninad Vijayrao Deshmukh • HT Marathi
Feb 16, 2023 08:25 PM IST

Mumbai local train wheel caught fire : मध्य रेल्वेच्या आसनगाव येथे अचानक धावत्या लोकल ट्रेनच्या चाकाला आग लागली. अचानक झालेल्या घटनेमुळे लोकल थांबताच प्रवाशांनी रेल्वेमधून उड्या मारत बाहेर पडले.

मुंबई : मध्य रेल्वेच्या कसारा-सीएसएमटी लोकलच्या चाकाला प्लॅस्टिक चिकटल्यामुळे अतिघर्षणामुळे या लोकलच्या चाकाला आग लागली. या गाडीच्या डब्यालाही आग लागल्याची माहिती मिळत आहे. कसारा स्थानक ओलांडताच चाकाला आग लागून धूर येत होता. ही बातमी प्रवाशांना कळताच त्यांनी चैन ओढून लोकल थांबवली. यानंतर प्रवाशांनी जिवाच्या आकांताने अक्षरक्ष: डब्यातून उड्या मारल्या. पाहता पाहता संपूर्ण गाडी ही रिकामी झाली. ही घटना आज सकाळी ८ वाजून १८ मिनिटांनी आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ घडली.

ट्रेंडिंग न्यूज

कसारा-सीएसएमटी लोकल कसाऱ्याहून मुंबईसाठी आज सकाळी ८ वाजून १८ मिनिटांची निघाली. दरम्यान, कसारा स्थानक ओलांडताच या लोकलच्या चाकाला आग लागली. या गाडीतून धूर निघत असल्याने प्रवाशांचा गाडीला आग लागळ्याच्या समज झाला. ही रेल्वे लोकल आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ येताच काही घाबरलेल्या प्रवाशांनी चैन ओढून लोकल थांबवली. काही प्रवाशांच्या मदतीने चाकाला लागलेल्या छोट्या स्वरूपातील आगीवर पाणी टाकून ती विझवण्यात आली. या घटनेमुळे २० मिनिटं गाडी लेट झाली. यानंतर जिवाच्या आकांताने प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्याने गोंधळ निर्माण झाला. ही घटना रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सजताच ते देखील घटनास्थळी दाखल झाले.

Rohit Pawar : राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप? रोहित पवारांच्या 'या' विधानामुळे चर्चांना उधाण

दरम्यान, चाकाला प्लॅस्टिक लागल्यामुळे ब्रेकमध्ये घर्षण झाल्याने लोकलच्या चाकाला आग लागल्याअधिकाऱ्यांनी संगितले. ऐन सकाळी चाकरमान्यांची कार्यालयाकडे जाण्यासाठी गर्दी असते. अशाच वेळी लोकलला आग लागल्यामुळे मोठा खोळंबा निर्माण झाला.