Mumbai Local Train: भोजपुरी गाण्यावर लोकल रेल्वेमध्ये तरुणीचा अश्लील डान्स, प्रवाशांकडून कारवाईची मागणी, पाहा VIDEO-mumbai local train video vulgar dance video viral mumbai railways yatri twitter ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Local Train: भोजपुरी गाण्यावर लोकल रेल्वेमध्ये तरुणीचा अश्लील डान्स, प्रवाशांकडून कारवाईची मागणी, पाहा VIDEO

Mumbai Local Train: भोजपुरी गाण्यावर लोकल रेल्वेमध्ये तरुणीचा अश्लील डान्स, प्रवाशांकडून कारवाईची मागणी, पाहा VIDEO

Feb 24, 2024 11:56 PM IST

Mumbai Local train Video : मुंबईत लोकलच्या महिलांच्या डब्यात डान्स करणाऱ्या एका तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे.

Mumbai local train video viral
Mumbai local train video viral

Mumbai Local Train Video : सोशल मीडियावर कमी वेळेत लोकप्रियता मिळवण्यासाठी तरुणांकडून नको ते कृत्य केले जात आहे. तरुण-तरुणी इंस्ट्राग्राम, फेसबुक, यूट्यूबवर रील्स बनवण्यासाठी सर्व मर्यादा तोडत आहेत. मेट्रो, भारतीय रेल्वे, लोकल ट्रेनमध्ये अश्लील डान्स करत व्हिडिओ शूट केले जात आहेत. असे व्हिडिओ लोकप्रियता व लाईक्स मिळवण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत. असे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत आहेत.

मुंबईतील लोकल ट्रेनमध्येही रील्स बनवण्याचे प्रकार समोर आले आहेत. आता लोकलच्या महिलांच्या डब्यात डान्स करणाऱ्या एका तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे. लोकलमध्ये अश्लील नृत्य करण्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वे पोलिसांनी असे करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांनी केली होती. याप्रकरणांची दखल घेत रेल्वे पोलिसांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.

 

लोकल ट्रेनमधील व्हिडिओ सोशल माध्यमातून वायरल झाल्यानंतर नेटकऱ्याने हा व्हिडीओ एक्सवर पोस्ट करुन मुंबई पोलीस,पश्चिम रेल्वेला टॅग केलं आहे. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत त्या पोस्टला रिप्लाय दिला आणि संबंधित प्रकरणी कारवाईचे आदेश दिले आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत दिसते की, काळ्या ड्रेसमधील तरुणी संया मारे सटा सट या भोजपुरी गाण्यावर अश्लील हावभाव करुन डान्स करत आहे.  महिलांच्या डब्यात डान्स करताना या तरुणी कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पण या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे.