Mumbai local train : नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून जल्लोष करत असतात. या दरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबईची लोकल सज्ज झाली आहे. रेल्वे प्रशासनाने ३१ डिसेंबरसाठी मोठा निर्णय घेतला आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेकडून विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. या विशेष लोकल फेऱ्या ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीच्या पहाटेपर्यंत सुरू राहणार आहेत.
मध्य रेल्वेच्या मुख्य लाइनवर ४ ट्रेन धावणार आहेत. २ लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान आणि २ लोकल हार्बर लाइनवर सीएसएमटी ते पनवेल दरम्यान सोडण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट आणि विरार स्थानकांदरम्यान ८ विशेष लोकल सोडल्या जातील. त्याचबरोबर ३१ डिसेंबरच्या रात्री अनुचित प्रकार टाळण्यासाठी चर्चगेट, मरीन लाइन्स आणि गिरगाव स्टेशन्सवर अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मध्यरात्री १.३० वाजता सुटणार आणि पहाटे ३ वाजता कल्याणला पोहोचणार.
कल्याण येथून मध्यरात्री १.३० वाजता सुटणार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पहाटे ३ वाजता पोहोचणार.
हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मध्यरात्री १.३० वाजता सुटणार आणि पहाटे २.५० वाजता पनवेल येथे पोहोचणार.
पनवेल येथून मध्यरात्री १.३० वाजता ट्रेन सुटणार आणि २.५० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचणार.
चर्चगेट येथून मध्यरात्री सव्वा एक वाजता रवाना आणि २.५५ वाजता विरारला पोहोचणार.
चर्चगेट येथून मध्यरात्री २ वाजता रवाना होणार आणि ३.४० वाजता विरारला पोहोचणार.
चर्चगेट येथून पहाटे २.३० वाजता रवाना होणार आणि ४.१० वाजता विरारला पोहोचणार.
चर्चगेट येथून पहाटे ३.२५ वाजता रवाना होणार आणि ५.०५ वाजता विरारला पोहोचणार.
मध्यरात्री १२.१५ वाजता विरारहून सुटणार आणि १.५२ वाजता चर्चगेटला पोहोचणार.
मध्यरात्री १२.४५ वाजता विरार येथून लोकल सुटणार आणि २.२२ वाजता चर्चगेट येथे पोहोचणार.
मध्यरात्री १.४० वाजता विरार येथून सुटलेली लोकल ३.१७ वाजता चर्चगेटला पोहोचणार.
या सर्व स्पेशल ट्रेन्स सर्व रेल्वे स्थानकांवर थांबणार आहेत.
संबंधित बातम्या