मुंबई लोकलच्या तिन्‍हीही मार्गांवर आज मेगाब्लॉक; घराबाहेर पडण्याआधी रेल्वेचे वेळापत्रक नक्की पाहा!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबई लोकलच्या तिन्‍हीही मार्गांवर आज मेगाब्लॉक; घराबाहेर पडण्याआधी रेल्वेचे वेळापत्रक नक्की पाहा!

मुंबई लोकलच्या तिन्‍हीही मार्गांवर आज मेगाब्लॉक; घराबाहेर पडण्याआधी रेल्वेचे वेळापत्रक नक्की पाहा!

Jan 12, 2025 10:50 AM IST

Mumbai Mega Block Today: मुंबई लोकलच्या तिन्‍हीही मार्गांवर आज मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे काही कामानिमित्त घराबाहेर पडण्याआधी रेल्वेचे वेळापत्रक पाहून घ्या.

मुंबई लोकलच्या तिन्‍हीही मार्गांवर आज मेगाब्लॉक
मुंबई लोकलच्या तिन्‍हीही मार्गांवर आज मेगाब्लॉक

Mumbai Local Train Updates: अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी आज मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी १२.३० वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. या काळात अनेक लोकल या उशिराने सुरु असतील. तर काही रेल्वे लोकल या रद्द करण्यात येतील. त्यामुळे रविवारी जर बाहेर पडणार असाल तर ही बातमी नक्की वाचा.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेच्या मुख्यमार्गावर विद्याविहार ते ठाणे दरम्यान पाचवी आणि सहाव्या मार्गेगेवर सकाळी ०८.०० ते दुपारी १२:३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या काळात अप आणि डाऊन मेल एक्सप्रेस गाड्या ठाणे इथे जलद मार्गावर आणि विद्याविहार स्थानकावर डाऊन जलद मार्गावर वळवले जातील. यामुळे गाड्या १० ते पंधरा मिनिटे उशिरा धावतील.

  •  कर्जत स्थानकावर विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. कर्जत येथे दुपारी १.५० मिनिटांनी मेगाब्लॉक सुरू होईल, जो १ तास ४५ मिनिटांचा असेल. या कालावधीत बदलापूर-खोपोली लोकल सेवा बंद असेल.
  •  दुपारी १२.२० वाजता सीएसएमटी-खोपोली लोकल आणि दुपारी १.१९ वाजता सीएसएमटी- कर्जत लोकल अंबरनाथपर्यंत चालवली जाईल.
  •  सीएसएमटीहून सुटणारी कर्जत लोकल दुपारी १.४० वाजता सुटेल आणि बदलापूरपर्यंत धावेल.
  •  कर्जतहून सीएसएमटीच्या दिशेने धावणारी लोकल दुपारी १.५५ मिनिटांनी अंबरनाथ येथून सुटेल.
  •  खोपोली-सीएसएमटी लोकल दुपारी १.४८ मिनिटांनी अंबरनाथ येथून सुटेल.
  •  कर्जत-सीएसएमटी लोकल ३.२६ मिनिटांनी बदलापूर येथून सुटेल.

ट्रान्स हार्बर

  •  अप आणि डाउन ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/ नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी ११.१० ते संध्याकाळी ०४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
  •  वाशी/नेरूळ येथून ठाण्याच्या दिशेने सुटणाऱ्या गाड्या आणि ठाणे येथून वाशी/नेरुळ/पनवेलच्या दिशेने धावणाऱ्या गाड्या सकाळी १० ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत बंद असतील.

पश्चिम रेल्वे

  •  ब्लॉक कालावधीत सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान सर्व लोकल धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. काही अंधेरी आणि बोरिवली ट्रेन गोरेगावपर्यंत चालविण्यात येतील.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर