mumbai local central railway news today : कर्जत-भिवपुरी दरम्यानच्या रुळांवर तांत्रिक बिघाड झाल्याने सेन्ट्रल लाईनवरील लोकल सेवा विस्कळीत झाल्याची माहिती समोर येत आहे. कर्जत-कल्याण दरम्यानची लोकल सेवा ठप्प झाली असून त्यामुळं सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. भिवपुरी रोड स्टेशन नजीकच्या हेडमास्तर ऑफिसजवळ अप ट्रॅकला खड्डा पडल्याने या मार्गावरील सर्व लोकल थांबवण्यात आल्या आहे. त्यामुळं प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. त्यानंतर आता रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी भिवपुरी स्थानकाजवळील हेडमास्तर कार्यालयाजवळ अप ट्रॅकवर मोठा खड्डा पडल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर या मार्गावरून जाणाऱ्या सर्व लोकल थांबवण्यात आल्या आहे. त्यामुळं सेन्ट्रल लाईनवरील रेल्वेंचं वेळापत्रक कोलमडलं आहे. कल्याण-कर्जत मार्गावरील सर्व लोकल आणि अन्य रेल्वे पुढील सूचनेपर्यंत स्थगित रद्द आल्या आहे. परिणामी गेल्या तासाभरापासून या मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. त्यामुळं आता सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
कर्जत-कल्याण रेल्वे मार्गावरून लोकलसह अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे धावत असतात. त्यामुळं या मार्गावरून सतत मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. परंतु आता या मार्गावरील रुळांवर तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक खोळंबली आहे. त्यानंतर आता रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. पुढील काही तासांत ट्रॅक वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. परंतु कामावर जाण्यासाठी उशीर होत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
संबंधित बातम्या