मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल आज रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे धावणार
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल आज रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे धावणार

मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल आज रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे धावणार

Dec 25, 2024 09:27 AM IST

Mumbai Local News : आज नाताळाची सुट्टी घालवण्यासाठी घराबाहेर पडणार असाल तर ही बातमी वाचा. आज मध्य रेल्वेच्या लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे लोकल धावणार आहे.

मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल आज रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे धावणार
मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! लोकल आज रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे धावणार (HT)

Mumbai Local News : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. आज नाताळ सण असून हा सण साजरा करण्यासाठी आज जर तुम्ही घराबाहेर पडणार असाल तर मध्य रेल्वेचे वेळापत्रक तपासून प्रवासाचे नियोजन करा. कारण आज सुट्टीमुळं मध्य रेल्वेने रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे लोकल चालविण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आज धावणाऱ्या लोकल फेऱ्यांची संख्या ही कमी राहणार आहे. त्यामुळे हे मध्य रेल्वेचे बदललेलं वेळापत्रक बघूनच बाहेर पडा असे आवाहन करण्यात आले आहे.

मध्य रेल्वेच्या सोशल मीडिया अकाउंटवरून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. या पोस्टमध्ये प्रवाशांनी लोकलचे वेळापत्रक तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत रोज लाखो प्रवासी हे मध्य रेल्वेच्या लोकलने प्रवास करत असतात. रोज जवळपास १८१० लोकल धावत असतात. मात्र, रविवारी ४५० ते ४०० लोकल या कमी धावतात. आज नाताळनिमित्त सुट्टी असल्याने रविवार प्रमाणे आज ४०० लोकल धावणार नाहीत. त्यामुळे ज्यांना आज सुट्टी नाही अशा नागरिकांची आज गैरसोय होणार आहे.

अनेक एसी लोकल रद्द

रविवारी अनेक एसी लोकल रद्द केल्या जातात. त्या प्रमाणे आज देखील ख्रिसमसच्या दिवशी काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक कार्यालयांना सुट्टी आज सुट्टी नाही. त्यात कामानिमित्त आज मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडणार आहेत. मात्र, रोजच्या अनेक लोकल आज धावणार नसल्याने त्यांना ऑफिसमध्ये पोहोचण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.

मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे आज अनेकांची अडचण होणार आहे. त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचण्यासाठी उशीर होण्याची शक्यता आहे. शासकीय कार्यालयांना ख्रिसमसनिमित्त सुट्टी आहे. तर अनेक खासगी कर्मचाऱ्यांना आज सुट्टी नाही. त्यामुळे त्यांची आज गैरसोय होणार आहे.

मुंबईत आज पासून चोख बंदोबस्त

नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर आजपासून मुंबईत चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ३१ तारखे पर्यंत हा बंदोबस्त राहणार आहे. शहरात कोम्बिंग ऑपरेशन, हॉटेल-लॉजिंगची तपासणी सुरू आहे. तर काही ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. ख्रिसमस आणि थर्टी फर्स्टनिमित्त हॉटेलबरोबरच समुद्रकिनाऱ्यांवरही अनेक पार्ट्या केल्या जातात. त्यामुळे त्या ठिकाणी देखील पोलिसांनी गस्त घालणे सुरू केले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर