मुंबईकरांनो, रविवारी बाहेर जाण्याचा प्लान असेल तर रेल्वेचे वेळापत्रक तपासा; उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबईकरांनो, रविवारी बाहेर जाण्याचा प्लान असेल तर रेल्वेचे वेळापत्रक तपासा; उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

मुंबईकरांनो, रविवारी बाहेर जाण्याचा प्लान असेल तर रेल्वेचे वेळापत्रक तपासा; उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

Updated Oct 05, 2024 09:58 AM IST

Mumbai railway mega block : रविवारी रेल्वेच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी तसेच सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे काही रेल्वे गाड्या रद्द तर काही लोकलची वेळ बदलण्यात आली आहे.

मुंबईकरांनो रविवारी बाहेर जणाचा प्लॅन असले तर रेल्वेचे वेळापत्रक तपासा; उद्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक
मुंबईकरांनो रविवारी बाहेर जणाचा प्लॅन असले तर रेल्वेचे वेळापत्रक तपासा; उद्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

Mumbai railway mega block : मुंबईकरांनो उद्या रविवारी सुट्टीसाठी घराबाहेर पडण्याचा प्लॅन असेल तर लोकलचे वेळापत्रक पाहून घरा बाहेर पडा. कारण उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी हा ब्लॉक घोषित करण्यात आला असून या ब्लॉक काळात काही गाड्या रद्द तर काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे उद्याची सुट्टी घरीच राहून किंवा वाहतुकीच्या इतर साधनांचा विचार करून घालवावी लागणार आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी तिन्ही मार्गावर उद्या रविवारी मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. ब्लॉक काळात मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण स्थानकांदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर उद्या रविवारी सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. दरम्यान, या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) वरुन सुटणाऱ्या डाऊन जलद तसेच काही अर्ध जलद लोकल गाड्या या ठाणे व कल्याण स्थानकादरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात अळ्या आहेत. यामुळे काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही लोकल गाड्या या १० ते १५ मिनिटे उशिराने धावणार आहेत.

तर पनवेल व वाशी स्थानकांदरम्यान अप व डाऊन स्थानकादरम्यान हार्बर मार्गावर सकाळी ११.५ ते संध्याकाळी ४.५ दरम्यान, हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मार्गावरील ब्लॉक काळात सीएसएमटी-वाशी हार्बर मार्गावर काही विशेष गाड्या धावणार आहेत. तर ठाणे-वाशी-नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर लोकल सेवा सुरू राहणार आहे. ब्लॉक काळात बेलापूर-नेरुळ-उरण स्थानकादरम्यान पोर्ट लाइन मार्गावर गाड्या सुरू राहणार आहे.

तर रेल्वेच्या पश्चिम मार्गावर तब्बल १० तासांचा ब्लॉक रविवार साठी घोषित करण्यात आला आहे. या काळात सीएसएमटीवरून पनवेल-बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर पनवेल ठाणे दरम्यानच्या ट्रान्सहार्बर मार्गावरील दोन्ही दिशेच्या सेवा या बंद ठेवल्या जाणार आहेत. तर बेलापूर-उरण व नेरूळ-उरण लोकल सेवा ही सुरू राहणार आहे. तर गोरेगाव-कांदिवली सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी पाचव्या मार्गिकेवर आज शनिवारी रात्री ११ पासून ते उद्या रविवारी सकाळी ११ पर्यंत हा ब्लॉक घेतला जाणार आहे. प्रवाशांनी रेल्वेचे वेळापत्रक पाहून प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर