Mumbai Local Train Viral Video: सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात. या व्हिडिओंमध्ये वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारचे कृत्य करताना दिसतात. काही व्हिडिओ मनोरंजक असतात. तर, काही व्हिडिओ भावूक करतात. दरम्यान, मुंबईची लाइफलाईन असलेल्या मुंबई लोकलमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक मुलगा आपले फिटनेस दाखवताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना आपल्या डोळ्यांवर बसेना. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.
मुंबईच्या लोकल ट्रेनमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. सध्या मुंबई लोकलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये अनेक प्रवासी मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये बसलेले दिसत आहेत. दरम्यान, ट्रेनमध्ये एक मुलगाही दिसत आहे, जो आपला फिटनेस दाखवतानाचा व्हिडिओ तयार करत आहे. या व्हिडिओत तो उलट दिशेने आपली मान फिरवतो, हे पाहून तिथे उपस्थित असलेल्या लोकांना आश्चर्य वाटते. यानंतर तो मायकल जॅक्सनप्रमाणे मूनवॉक करतानाही दिसत आहे. त्या मुलाकडे पाहून असे वाटते की त्याच्या शरीरात हाडच नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
@Gulzar_sahab नावाच्या ट्विटर अकाऊंवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 'भाऊ, तू माणूस आहेस की रोबोट' असे लिहिले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी तरुणाच्या टॅलेंटचे कौतूक केले आहे. तर, काही जणांनी संताप व्यक्त केला आहे.
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये कमेंट करताना एका युजरने म्हटले आहे की, ‘तू कोणत्या मातीचा बनलेला आहेस?’ दुसऱ्या युजरने म्हटले आहे की, ‘अरे यार! हे काय आहे? या मुलाकडे खूप भारी टॅलेंट आहे.’ तिसऱ्या युजरने म्हटले आहे की, ‘हा हाडे मोडणारा डान्स आहे.’ चौथ्या युजरने म्हटले आहे की, ‘गाड्यांमध्ये गाणी गाऊन आणि ढोलक वाजवून हे सर्व भिकारी करायचे आणि करत आहेत. मात्र, आता काळ बदलला आहे, सोशल मीडियाचे युग आहे आणि या मोठ्या भिकाऱ्यांना आता थेट बँक खात्यात पैसे मिळतात याला आता डिजिटल डान्स म्हणतात.’