Mumbai Local Train Updates: मुसळधार पावसानंतर हार्बर मार्गावरील लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या सीपीआरओने दिलेल्या माहितीनुसार, गोवंडी-मानखुर्द दरम्यान पाणी ओसरल्यानंतर हार्बर मार्गावरील लोकल सेवा सुरू करण्यात आली आहे. गाड्या सावधगिरीने आणि ताशी २५ किमी मर्यादित वेगाने धावत आहेत.
अनेक ठिकाणी पाऊस थांबल्यानंतर आणि रुळांवरून पाणी ओसरल्यानंतर मध्य रेल्वेच्या लोकल मुख्य मार्गावरील सेवा पूर्ववत करण्यात आली.मुसळधार पावसानंतर मुंबईत पाणी साचल्याने चुनाभट्टी रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवासी रुळांवर चालत गेले. पावसामुळे लोकलमध्ये अडकलेल्या लोकांसाठी मध्य मध्य रेल्वेने सोशल मीडियावर एक पोस्ट केली. प्रवाशांनी आपल्या सुरक्षतेसाठी ट्रेनमध्येच राहा आणि रुळांवर चालणे टाळा.मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्याने लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. आपण ट्रेनमध्ये सर्वात सुरक्षित आहात. पाणी ओसल्यानंतर लोकल सेवा पुन्हा आपल्या वेळेत धावतील.सर्वांच्या सुरक्षिततेसाठी तुमचे सहकार्य आवश्यक आहे.
भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला गुरुवारी (२६ सप्टेंबर २०२४) सकाळी ८.३० पर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सुटी जाहीर करण्यात येत आहे. आवश्यकता असेल तरच मुंबईकरांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून केले.
शहरात मुसळधार पाऊस झाला असला तरी पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय मार्गावरील लोकल गाड्या सुरळीत धावत आहेत. मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंब्रा बायपास रस्त्यावर बुधवारी रात्री दरड कोसळली. अग्निशमन अधिकारी स्वप्नील सरनोबत यांनी सांगितले की, सायंकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. रात्री साडेनऊच्या सुमारास आम्हाला या घटनेची माहिती मिळाली. रस्त्यावरील दगड हटवण्यात आले आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात आज अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले. मुंबई बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे सखळ भागात पाणी साचले. अंधेरी सबवे येथे दोन ते अडीच फूट पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली. याच बरोबर मुलुंड, विक्रोळी पट्टयात ठिकठिकाणीही पाणी साचले.