mumbai local train : केबल तुटल्यामुळे पश्चिम रेल्वेची लोकल सेवा ठप्प; बोरिवली स्थानकात अडकल्या गाड्या; प्रवाशांचे हाल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  mumbai local train : केबल तुटल्यामुळे पश्चिम रेल्वेची लोकल सेवा ठप्प; बोरिवली स्थानकात अडकल्या गाड्या; प्रवाशांचे हाल

mumbai local train : केबल तुटल्यामुळे पश्चिम रेल्वेची लोकल सेवा ठप्प; बोरिवली स्थानकात अडकल्या गाड्या; प्रवाशांचे हाल

Jun 03, 2024 09:44 AM IST

Mumbai Western Railway hit due to technical issues : मुंबईच्या पश्चिम रेल्वेची सेवा पुन्हा विस्कळीत झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे येथील अनेक लोकल या उशिराने धावत आहेत. बोरिवली स्थानकात केबलमध्ये बिघाड झाल्याने प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वरून सोडण्यात येणाऱ्या उपनगरीय गाड्या चालविल्या जात नव्हत्या.

बोरिवली स्थानकात केबलमध्ये बिघाड झाल्याने प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वरून सोडण्यात येणाऱ्या उपनगरीय गाड्या चालविल्या जात नव्हत्या.
बोरिवली स्थानकात केबलमध्ये बिघाड झाल्याने प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वरून सोडण्यात येणाऱ्या उपनगरीय गाड्या चालविल्या जात नव्हत्या. (File)

Mumbai Western Railway hit due to technical issues : मुंबईच्या लोकल सेवेमागील शुल्ककाष्ठ काही संपण्याची चिन्हे दिसत नाही. आज सकाळी बोरिवली रेल्वे स्थानकावर केबल तुटल्याने पश्चिम रेल्वेची सेवा पुन्हा विस्कळीत झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे येथील अनेक लोकल या उशिराने धावत आहेत. तर बोरिवली स्थानकात केबलमध्ये बिघाड झाल्याने प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वरून सोडण्यात येणाऱ्या उपनगरीय गाड्या स्थानकातच थांबल्या असल्याने प्रवाशांचे हाल झाले आहे.

Loksabha Election : उद्या लोकसभेचा निकाल, मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; मुंबई, पुण्यात चोख बंदोबस्त

मुंबईतील बोरिवली स्थानकात केबल तुटल्याने तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाले आहे. बोरिवली हे उत्तर मुंबईतील सर्वात वर्दळीचे रेल्वे स्थानक असून येथून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी आणि चाकरमानी लोकल सेवेचा वापर करतात. या बिघाडामुळे अनेक लोकल गाड्या या मध्येच थांबून असल्याची माहिती आहे. बोरिवली स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वरून केबल तुटल्याने काही ट्रॅक चेंजिंग पॉईंट बंद पडल्याने उपनगरीय गाड्या रोखण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या प्रवक्त्याने दिली.

AP Election results : शरद पवारांविना राष्ट्रवादीला पहिलं यश, अजित पवार राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी दावा करणार

स्थानकातील उर्वरित प्लॅटफॉर्म ३ ते ८ वरून गाड्या चालविल्या जात आहेत. पश्चिम रेल्वेने सांगितले की, तुटलेल्या केबलची दुरुती तातडीने हाती घेण्यात आली आहे. या ठिकाणी संचारबंदी करण्यात येत असून लोकलसेवा पूर्वपदावर आणण्यासाठी प्राधान्याने दुरुस्तीचे काम सुरू आहे

दक्षिण मुंबईतील चर्चगेट ते शेजारच्या पालघर जिल्ह्यातील डहाणू दरम्यान पसरलेल्या पश्चिम रेल्वेवर दररोज १३०० हून अधिक उपनगरीय सेवा चालवल्या जातात आणि सुमारे ३० लाख प्रवासी या नेटवर्कवर प्रवास करतात.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मनस्ताप; अनेक नागरिक अडकून पडले

मुंबईत रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे आधीच नागरिक वैतागले होते. हा मेगा ब्लॉक रविवारी पुर्ववत करण्यात आला. दरम्यान, आज सकाळी बोरिवली येथे केबल तुटल्याने वेस्टर्नरेल्वेची सेवा विस्कळीत झाली. अनेक लोकल गाड्या या बोरिवली स्थानकातच थांबवण्यात आल्या आहेत. यामुळे कामासाठी निघालेल्या अनेक प्रवासी, कर्मचारी हे गाड्यांमध्ये अडकून पडले आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी त्यांना कामावर जाण्यास विलंब झाल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.

बोरिवलीतील प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ बंद

ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीच्या कामामुळे बोरिवलीतील प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ बंद करण्यात आला आहे. धीम्या गतीने चालणाऱ्या लोकल गाड्या सुमारे १५  ते २०  मिनिटे उशिराने धावत आहेत. प्रवाशांच्या मदतीसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वर रेल्वे स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर