मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Local Train: मुंबईकरांनो आज घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलचं वेळापत्रक बघा! मुख्य, हार्बर मार्गावर ‘मरे’चा मेगाब्लॉक

Mumbai Local Train: मुंबईकरांनो आज घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलचं वेळापत्रक बघा! मुख्य, हार्बर मार्गावर ‘मरे’चा मेगाब्लॉक

Jun 16, 2024 07:03 AM IST

Mumbai Railway Trains Updates: मुंबईत आज मुख्य, हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे उपनगरीय रेल्वे सेवेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांनी लोकलचे वेळापत्रक पाहून घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईकरांनो आज घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलचं वेळापत्रक बघा! मुख्य, हार्बर मार्गावर ‘मरे’चा मेगाब्लॉक
मुंबईकरांनो आज घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलचं वेळापत्रक बघा! मुख्य, हार्बर मार्गावर ‘मरे’चा मेगाब्लॉक

Mumbai local mega block : मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. आज मध्य रेल्वे मार्गावर अभियांत्रिकी व देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी ११:०५ ते दुपारी ३:०५ वाजेपर्यंत माटुंगा व मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. अप आणि डाऊन हार्बर मार्गावर कुर्ला व वाशी स्थानकादरम्यान सकाळी ११:१० ते दुपारी ४:१० पर्यंत ब्लॉक असणार आहे.

या मेगाब्लॉकमुळे सीएसएमटी येथून सकाळी १०:२५ ते दुपारी २:४५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा येथे डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. तर माटुंगा व मुलुंड स्थानकादरम्यानच्या नियोजित थांब्यांवर लोकल थांबतील. या काळात या गाड्या १५ मिनिटे उशिरा धावतील. ठाण्यापलीकडे जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. पनवेल-बेलापूर- वाशीसाठी सकाळी १०:३४ ते दुपारी ३:३६ वाजेपर्यंत सीएसएमटीकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी १०:१६ ते दुपारी ३:४७ वाजेपर्यंत सुटणाऱ्या पनवेल-बेलापूर- वाशीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहील.

ट्रेंडिंग न्यूज

ब्लॉक कालावधीत सीएसएमटी- कुर्ला आणि पनवेल-वाशीदरम्यान विशेष उपनगरीय गाड्या चालविल्या जातील.

डाऊन धिम्या लाइनवर

ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल बदलापूर आहे. सीएसएमटी येथून ही लोकल सकाळी १०:२० वाजता सुटणार आहे. - ब्लॉकनंतर पहिली लोकल बदलापूर आहे. सीएसएमटी येथून ही लोकल दुपारी ३ वाजता सुटणार आहे.

डाऊन हार्बर मार्गावर

- ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल पनवेल आहे. सीएसएमटी येथून ही लोकल सकाळी १०:१८ वाजता सुटणार आहे. ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल आहे. सीएसएमटी येथून ही लोकल दुपारी ३:४४ वाजता सुटणार आहे.

अप हार्बर मार्गावर

- सीएसएमटीसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सकाळी १०:०५ वाजता पनवेल येथून सुटणार आहे.

- सीएसएमटीसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल येथून दुपारी ३:४५ वाजता सुटेल.

WhatsApp channel