मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Local Train Maga block : रविवारी फिरायला जायचा प्लान करताय? मेगाब्लॉकची वेळ बघूनच बाहेर पडा!

Mumbai Local Train Maga block : रविवारी फिरायला जायचा प्लान करताय? मेगाब्लॉकची वेळ बघूनच बाहेर पडा!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 24, 2023 07:33 PM IST

Mumbai Railway Mega block on Sunday, 26 March 2023 : येत्या रविवारी, म्हणजेच २६ मार्च रोजी मध्य रेल्वेनं दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेतला आहे.

Railway Mega block
Railway Mega block

Mumbai Railway Mega block on 26 March 2023 : नियमित देखभाल दुरुस्ती व अभियांत्रिकी कामासाठी रविवार, २६ मार्च २०२३ रोजी मध्य रेल्वेनं उपनगरीय मार्गावर मेगाब्लॉक जाहीर केला आहे.

मध्य रेल्वे : ठाणे-कल्याण सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सकाळी ९.३० ते दुपारी २.४५ या वेळेत सुटणाऱ्या जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान स्लो ट्रॅकवर वळवण्यात येतील. या गाड्या त्यांच्या पूर्वनियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान थांबतील आणि निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिरानं निश्चित स्थानकावर पोहोचतील.
  • कल्याणहून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.२५ पर्यंत सुटणाऱ्या जलद लोकल कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान स्लो ट्रॅकवर वळवल्या जातील. या गाड्या त्यांच्या पूर्वनियोजित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान थांबून पुन्हा जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि १० मिनिटं उशिरानं निश्चित स्थानकावर पोहोचतील.

Paytm Train Ticket : पेटीएमवरून बुक केलेलं ट्रेन तिकीट रद्द केल्यास ग्राहकांना १०० टक्के रिफंड

हार्बर रेल्वे : कुर्ला- वाशी मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ या वेळेत पनवेल/बेलापूर/वाशी साठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील लोकल बंद राहतील.
  • वाशी/बेलापूर/पनवेल येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल बंद राहतील.
  • ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कुर्ला आणि वाशी - पनवेल स्थानकांदरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
  • हार्बर मार्गावरील प्रवाशांना ट्रान्सहार्बर मार्गे (ठाणे-वाशी/नेरुळ) सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.

बर्फाची चादर, गार वारा अन् भन्नाट रेल्वे प्रवास!

WhatsApp channel