रविवार दिनांक २ एप्रिल रोजी मुंबईत मध्य रेल्वे मार्गावर ‘मेगा ब्लॉक’ असणार आहे. त्यामुळे ठाणे ते कल्याण (अप आणि डाउन) जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.३० ते दुपारी २.४५ दरम्यान सुटणाऱ्या जलद लोकल ट्रेन ठाणे आणि कल्याणदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या लोकल ट्रेन निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने शेवटच्या स्टेशनवर पोहोचतील, अशी माहिती रेल्वेकडून जारी करण्यात आली आहे.
तर, कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.२५ च्या दरम्यान सुटणाऱ्या जलद लोकल ट्रेन कल्याण आणि ठाणे स्टेशनदरम्यान धीम्या मार्गावर वळवल्या जातील.
हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक
पनवेल ते वाशी (अप आणि डाउन) हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत संपूर्ण मेगा ब्लॉक असणार आहे. पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल ट्रेन सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ दरम्यान बंद राहतील. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील लोकल ट्रेन रद्द राहतील.
ठाणे - पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक
ठाण्याहून पनवेलकरिता जाणाऱ्या लोकल ट्रेन या सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत रद्द राहतील. तर पनवेलहून ठाण्याकडे जाणाऱ्या लोकल ट्रेन ११.०२ ते दुपारी ३.५३ दरम्यान रद्द राहतील.
सीएसएमटी ते वाशी विशेष ट्रेन धावणार
मेगा ब्लॉक दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते वाशी मार्गावर ‘विशेष लोकल’ धावतील.
ठाणे ते वाशी विशेष ट्रेन धावणार
रविवारी ब्लॉक कालावधीत ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी आणि ठाणे ते नेरुळ स्थानकांदरम्यान मात्र लोकल सुरू राहणात आहेत.
बेलापूर - खारकोपर लोकल सुरू राहणार
ब्लॉक कालावधीत बेलापूर - खारकोपर आणि नेरुळ - खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील, अशी माहिती मध्य रेल्वेकडून जारी करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या