Mumbai Megablock : मध्य रेल्वेकडून रविवारी (१७ सप्टेंबर) विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय मार्गांवर मेगा ब्लॉक कार्यान्वित केला जाणार आहे. अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई लोकलमधील मुलूंड ते कल्याण या मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
ठाणे-कल्याण अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११.०० ते दुपारी ०४.०० पर्यंत.
मुलुंडहून सकाळी १०.४३ ते दुपारी ३.४४ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या/अर्ध जलद सेवा मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि ठाणे, दिवा, डोंबिवली स्थानकांवर थांबतील व गंतव्य स्थानकावर नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील.
कल्याणहून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.५१ पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या / अर्ध जलद सेवा कल्याण आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि डोंबिवली, दिवा, ठाणे स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील व गंतव्य स्थानकावर नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने पोहोचतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.०० ते संध्याकाळी ०५.०० दरम्यान सुटणाऱ्या व येणाऱ्या सर्व अप आणि डाऊन धीम्या सेवा नियोजित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने आगमन होईल तसेच विलंबाने सुटतील.
पायाभूत सुविधा व सुरक्षिततेसाठी हे देखभाल करणारे मेगा ब्लॉक आवश्यक आहेत. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वेने केले आहे.
पश्चिम मार्ग -
गोरेगाव आणि सांताक्रूझ अप धीम्या आणि डाऊन जलद मार्गावर
शनिवारी रात्री १२.१५ ते पहाटे ४.१५ वाजेपर्यंत परिणाम : ब्लॉक कालावधीत सांताक्रूझ – गोरेगाव स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावरील लोकल डाऊन धीम्या मार्गावर चालवण्यात येतील. तर अप धीम्या मार्गावरील लोकल अंधेरी – खार रोड स्थानकांदरम्यान अप हार्बर मार्गावर चालवण्यात येतील. ब्लाॅकदरम्यान काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.
संबंधित बातम्या