Mega Block : मुंबईकरांनो इकडं लक्ष द्या! रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, पाहा वेळापत्रक
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mega Block : मुंबईकरांनो इकडं लक्ष द्या! रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, पाहा वेळापत्रक

Mega Block : मुंबईकरांनो इकडं लक्ष द्या! रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, पाहा वेळापत्रक

Jul 20, 2024 08:57 PM IST

Mumbai local train Mega block : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवारी२१ जुलै रोजी अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामे करण्यात येणार असून त्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉकघेण्यात येणार आहे.

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

Mumbai Mega Block : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी असून रविवारी बाहेर फिरण्याचा प्लान करत असाल तर लोकलच्या मेगाब्लॉकचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा. रविवारी मध्य, पश्चिम तसेच हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवारी २१ जुलै रोजी अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामे करण्यात येणार असून त्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक  घेण्यात येणार आहे. 

मध्य रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक -

मध्य रेल्वेच्या माटुंगा -मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील सीएसएमटी- चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन मेगाब्लॉक असणार आहे.

रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी २.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. 

सकाळी १०.५० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत ठाणे स्थानकातून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील, 

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी ११. १० वाजल्यापासून ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत सीएसएमटी - चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

 

हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक कालावधी -

मेगाब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून वाशी, बेलापूर आणि पनवेलसाठी सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील लोकलसेवा बंद राहणार आहे. सीएसएमटी येथून वांद्रे, गोरेगावसाठी डाउन हार्बर मार्गावरील लोकलसेवा बंद राहणार आहे. तर, पनवेल, बेलापूर आणि वाशी येथून सीएसएमटीकरता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहिल. मेगाब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला दरम्यान विशेष लोकलसेवा २० मिनिटांनी चालवण्यात येतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि  छत्रपती शिवाजी महाराज  टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत   वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या/सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या  अप हार्बर लाईन सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक -

पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मध्यरात्री १ वाजल्यापासून ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत सांताक्रूझ ते माहीम अप - डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान अप-डाऊन धिम्या मार्गावरील लोकलसेवा मुंबई सेंट्रल ते सांताक्रूझ रेल्वे स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. 

Whats_app_banner