Viral Video: मुंबई लोकलमध्ये तरुणांनी उघडलं चालतं फिरतं रेस्टॉरंट; पाहून प्रवासी झाले थक्क!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Viral Video: मुंबई लोकलमध्ये तरुणांनी उघडलं चालतं फिरतं रेस्टॉरंट; पाहून प्रवासी झाले थक्क!

Viral Video: मुंबई लोकलमध्ये तरुणांनी उघडलं चालतं फिरतं रेस्टॉरंट; पाहून प्रवासी झाले थक्क!

Nov 21, 2023 02:49 PM IST

Mumbai Local Train Five Star Restaurant: मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये सुरु केलेल्या फाईव्ह स्टार रेस्टॉरंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Mumbai Local Train Restaurant
Mumbai Local Train Restaurant

Mumbai Local Train Restaurant: मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन कायमच खचाखच भरलेली असते. मुंबईच्या उपनगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रवासासाठी लोकल ट्रेन सर्वात कमी खर्चिक पर्याय आहे. त्यामुळे दररोज शेकडो नागरिक ट्रेननेच प्रवास करतात. दरम्यान, मुंबईच्या लोकलमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, दोन तरुणांच्या युनिक स्टार्टअपने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या तरुणांनी मुंबई लोकल ट्रेनमध्ये चालते फिरते रेस्टॉरंट सुरु केले आहे, ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.

आर्यन कटारिया आणि सार्थक सचदेवा यांनी हा स्टार्टअप सुरू केला आहे. दोघांनीही आपल्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट करून ही माहिती दिली. यामध्ये हे दोघेही लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या लोकांशी संवाद साधताना दिसत आहेत. तसेच त्यांचे अनुभव शेअर करत आहेत. कटारिया आणि सचदेवा सांगतात की, त्यांनी मुंबई लोकल ट्रेनमध्ये फाईव्ह स्टार रेस्टॉरंट सुरू केले आहे. दोघांनीही याला टेस्टी तिकीट असे नाव दिले आहे. त्यांनी प्रवाशांमध्ये मेन्यू कार्ड वाटल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

आपल्या स्टार्टअपबाबत पहिला अनुभव शेअर करताना कटारिया आणि सचदेवा म्हणाले की,"जेव्हा लोकांना आमच्या स्टार्टअपचे मेन्यू कार्ड दाखवले, तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. मुंबई लोकलमध्ये असे काही घडू शकते, असा त्यांनी कधीच विचार केला नसेल."

व्हायरल व्हिडिओमध्ये हे दोघेही मुले प्रवाशांना गरम खाद्यपदार्श वाढताना दिसत आहे. ज्यात मॅगी सारख्या पदार्थांसह जिलेबी सॉस आणि स्वीट डेजर्ट यांचा समावेश आहे. हे लोक प्रवाशांना दिले जाणारे खाद्यपदार्थ मोठ्या बॅगमध्ये घेऊन जात आहेत. अनेकांना त्यांची कल्पना आवडली आहे. अनेक प्रवासी त्यांच्यासोबत सेल्फीदेखील घेत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर