Mumbai Local Train Update : मध्यरेल्वेमार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने शनिवारी सकाळी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. मध्य रेल्वेच्या टिटवाळा रेल्वे स्थानकावर विजपुरवठ्या दरम्यान, तांत्रिक बिघाड झाला. यामुळे अनेक गाड्या या पुढे जाऊ शकल्या नाही. परीमणी मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली. अनेक गाड्या या जागेवरच उभ्या राहिल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. या मार्गावरील लोकल या तब्बल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या.
मिळालेल्या महितीनुसार टिटवाळा व बदलापूर येथे देखील तांत्रिक बिघाड झाल्याने सेंट्रल रेल्वेची अप मार्गावरील वाहतूक ही उशिराने सुरू आहे. वीज पुरवठ्यात तांत्रिक बिघाड झाल्याने कर्जत व कसारा या दोन्ही मार्गांवरील रेल्वे सेवा १५ ते २० मिनीटे उशीराने धावत आहे.
कसारा मार्गावारून कल्याणला येणाऱ्या रेल्वे मार्गावर टिटवाळा स्थानकावर मोठा तांत्रिक बिघाड झाला आहे. तर कर्जतहून कल्याणला येणाऱ्या रेल्वे मार्गावर बदलापूर येथे तांत्रिक बिघाड झाला आहे. परिणामी या मार्गावरील लोकल या १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत. या तांत्रिक बिघाडाचा फटका सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांना बसला आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी मुंबईकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं असून लोकल अर्धा तास उशिराने धावत आहे. बदलापूर ते लोणावळा आणि कल्याण ते इगतपुरी ओव्हर हेड वायरचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने लोकल उशीराने धावत असल्याच सांगण्यात येत आहे. विद्युत पुरवठा सुरळीत मात्र त्यामुळे लोकलचं वेळापत्रक कोलमडल आहे. कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत रेल्वे वाहतूक २५ ते ३० मिनिटं उशिराने धावत आहे. विद्युत पुरवठ्या मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दोन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
संबंधित बातम्या