मुंबईत मोठा अपघात, लोकल ट्रेनने धडक दिल्याने ५ जणांचा मृत्यू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबईत मोठा अपघात, लोकल ट्रेनने धडक दिल्याने ५ जणांचा मृत्यू

मुंबईत मोठा अपघात, लोकल ट्रेनने धडक दिल्याने ५ जणांचा मृत्यू

HT Marathi Desk HT Marathi
Published Jun 09, 2025 11:43 AM IST

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत मोठा रेल्वे अपघात झाला आहे. लोकलमधून पडून ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. लोकलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते, अशी माहिती समोर आली आहे.

Mumbai, India. May 26, 2025: A local train stopped between Kurla and Sion due to heavy rain. Mumbai City witnessed heavy rain and waterlogging on Monday, The India Meteorological Department (IMD) issued a red alert to Mumbai and neighbouring Thane and Palghar districts. Mumbai, India. May 26, 2025.  (Photo by Raju Shinde/ Hindustan Times)
Mumbai, India. May 26, 2025: A local train stopped between Kurla and Sion due to heavy rain. Mumbai City witnessed heavy rain and waterlogging on Monday, The India Meteorological Department (IMD) issued a red alert to Mumbai and neighbouring Thane and Palghar districts. Mumbai, India. May 26, 2025. (Photo by Raju Shinde/ Hindustan Times) (Hindustan Times)

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत मोठा रेल्वे अपघात झाला आहे. लोकलमधून पडून ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. लोकलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते, अशी माहिती समोर आली आहे.

मुंब्रा ते दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान ही घटना घडली. अपघाताच्या वेळी पुष्पक एक्स्प्रेस आणि कसारा लोकल ओलांडत होत्या. गर्दीमुळे लोक डब्यातून खाली पडल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर प्रवासी दरवाजावर लटकून प्रवास करत असल्याचेही बोलले जात आहे. रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या दुर्घटनेनंतर मुंबई उपनगरासाठी बांधण्यात येत असलेल्या उर्वरित रेकमध्ये स्वयंचलित दरवाजे असतील, असा निर्णय रेल्वेने घेतला आहे. तसेच रुळांवर धावणाऱ्या रेकमध्ये बदल करून दरवाजा बंद करण्याची सुविधा देण्यात येणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर