Mumbai Local news : विक्रोळी स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड, मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Local news : विक्रोळी स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड, मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत

Mumbai Local news : विक्रोळी स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड, मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत

Updated Jun 13, 2024 11:58 AM IST

Mumbai Local train news : विक्रोळी स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली.

 मुंबई लोकल: सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे मुख्य मार्गावरील उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत
मुंबई लोकल: सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे मुख्य मार्गावरील उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत (HT)

Mumbai Local Train News: विक्रोळी स्थानकाजवळील सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे गुरुवारी सकाळी मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली. परिणामी, मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांवर गर्दी झाली असून प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावा लागत आहे. गुरुवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप जलद मार्गावरील सिग्नलिंग सिस्टममध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे काही लोकल गाड्या सुमारे तासभर खोळंबल्या, अशी माहिती रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिली.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी एक्सवरून दिलेल्या माहितीनुसार, "विक्रोळी स्थानकाजवळ सिग्नल तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. विक्रोळी स्थानकाजवळ लोकल गाड्या थांबवून ठेवल्या आहेत. यामुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.

तांत्रिक बिघाडामुळे २० ते ३० मिनिटे उशीराने सुरू आहेत. सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या जलद गाड्या एकामागून एक थांबून राहिल्याने अनेक प्रवासी पर्यायी वाहतुकीचा मार्ग वापरून ऑफिसला जाण्यासाठी पुढच्या स्थानकाकडे जाताना दिसले. मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल झाले.

मुंबईबाहेरील रायगड आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या उपनगरीय नेटवर्कवर मध्य रेल्वे दररोज १ हजार ८०० हून अधिक उपनगरीय सेवा चालवते. त्याच्या उपनगरीय नेटवर्कवरून ३० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात.

याआधी ३१ मे २०२४ रोजी मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे स्थानकांवर कामासाठी ६३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला. कुर्ला आणि परळ स्थानकांनंतर बहुतांश गाड्या संथ गतीने धावत होत्या. या कालावधीत प्रवाशांची तारांबळ उडाली. ठाणे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ५ ते ६ हा सर्वाधिक वर्दळीचा आहे. ३०० हून अधिक उपनगरीय आणि एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूक केली जाते. प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण एकूण ५८७ मीटर लांबीचे करण्यात आले. हे प्री-कास्ट ब्लॉकप्लॅटफॉर्म पृष्ठभाग सेटलमेंटची शक्यता कमी करतात. प्लॅटफॉर्म उभारणीसाठी अशा प्रकारचे ब्लॉक वापरण्याची ही पहिलीच वेळ होती. ३१ मे रोजी रात्री १२.३० वाजता सुरू झालेला ६३ तासांचा मेगाब्लॉक २ जून रोजी दुपारी संपला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर