मुंबईकरांनो उद्या रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा; तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, 'या' लोकल सेवा राहणार बंद-mumbai local megablock on harbour central and western lines of mumbai suburban railway on sunday 25th august ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबईकरांनो उद्या रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा; तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, 'या' लोकल सेवा राहणार बंद

मुंबईकरांनो उद्या रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा; तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, 'या' लोकल सेवा राहणार बंद

Aug 24, 2024 11:42 PM IST

Mumbai localmegablock : मुंबई लोकल रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गावर रविवारी २५ ऑगस्ट रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही लोकल या काळात रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक,
मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक,

उपनगरीय रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर रविवारी (२५ ऑगस्ट २०२४) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉक दरम्यान काही लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रविवारी जर बाहेर पडणार असाल तर रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा. मध्य रेल्वेवर सकाळी सकाळी ११:०५ ते दुपारी ३:०५ पर्यंत मेगाब्लॉक असेल. तर हर्बर मार्गावर सकाळी १०:३३ ते दुपारी ३:४९  वाजे पर्यंत मेगाब्लॉक असेल. तर पश्चिम रेल्वेवर सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत मेगाब्लॉक असेल. 

रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक –

मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ११:०५ ते दुपारी ३:०५ पर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून (सीएसएमटी) सकाळी साडेदहा ते दुपारी पावणेतीन या कालावधीत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. या मार्गावरील गाड्या १५ मिनिटे उशिरा आपल्या गंतव्याकडे रवाना होतील. ठाण्याच्या पुढे जलद मार्गावरील गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. 

पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक -

पश्विम रेल्वे मार्गावर बोरीवली-गोरेगाव अप व डाऊन स्लो लाईनवर मेगाब्लॉक असणार आहे. या मार्गावर सकाळी १० वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत बोरीवली आणि गोरेगाव दरम्यान सर्व अप आणि डाऊन स्लो मार्गावरील सेवा अप आणि डाऊन फास्ट मार्गावर वळवण्यात येतील. यामुळे काही अप आणि डाऊन उपनगरीय लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर अंधेरी आणि बोरीवली सेवा हार्बर मार्गावर गोरेगावपर्यंत चालवल्या जातील. ब्लॉक कालावधीत बोरीवली स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १, २, ३ आणि ४ वरून कोणत्याही सेवा चालविल्या जाणार नाहीत.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक काळात लोकल सेवा बंद -

हार्बर मार्गवरील पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. पनवेल - सीएसएमटीदरम्यान सकाळी १०:३३ ते दुपारी ३:४९ दरम्यान अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी - पनवेल/बेलापूर डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी ९:४५ ते दुपारी ३:१२ या वेळेत पूर्णपणे बंद राहतील.


मेगाब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी सेक्शनमध्ये विशेष लोकल चालवल्या जातील. ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर लोकल सेवा उपलब्ध असतील. त्याचबरोबर बेलापूर/नेरूळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाइन सेवा उपलब्ध असतील.