Mumbai local Mega block : मुंबईत रविवारी मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. देखभाल दुरुस्तीची कामे आणि सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी हा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. या ब्लॉक काळात काही लोकल फेऱ्या या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही लोकल गाड्या या विलंबाने धावणार आहेत. त्यामुळे जर उद्या कामानिमित्त किंवा सुट्टीसाठी बाहेर पडण्याचे नियोजन असेल तर लोकलचे वेळापत्रक तपासून बाहेर पडावे लागणार आहे.
रेल्वेच्या प्रसिद्धी विभागाने दिलेल्या माहितीनुसार उद्या मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे, आणि पश्चिम रेल्वे मार्गावर हा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. सिग्नल यंत्रणा आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा ब्लॉक घोषित करण्यात आला असून या काळात अनेक गाड्या या रद्द करण्यात आल्या आहेत. रविवारी ठाणे ते दिवा आणि कुर्ला ते वाशीदरम्यान ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वेने वसई रोड ते विरार मार्गावर शनिवारी मध्यरात्रीनंतर ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी दिवसा पश्चिम रेल्वे मार्गावर कोणताही ब्लॉक राहणार नाही असे देखील रेल्वे विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. या ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही लोकल फेऱ्या उशिराने धावणार आहेत.
मध्य रेल्वे मार्गावर ठाणे ते दिवा मार्ग स्थानका दरम्यानसकाळी १०.५० ते दुपारी ३.२० दरम्यान, ब्लॉक घेतला जाणार आहे. या काळात जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. यामुळे जलद व थीम्या मार्गावरील काही लोकल फेऱ्या या रद्द करण्यात अळ्या आहेत. काही लोकल गद्य या उशिराने धावणार आहे. १८ अप-डाउन मेल-एक्स्प्रेस देखील ब्लॉकमुळे उशिराणे धावणार आहेत.
कुर्ला ते वाशी मार्ग अप आणि डाऊन वेळ सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० दरम्यान मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. या ब्लॉक काळात सीएसएमटी ते पनवेल / बेलापूर/वाशीदरम्यान अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीदरम्यान विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत.
वसई रोड ते विरार मार्ग स्थानक अप आणि डाऊन धीमा मार्गावर शनिवारी मध्यरात्रीनंतर १२.१५ ते रविवारी पहाटे ४.१५ दरम्यान ब्लॉक घोषित करण्यात आला असून या काळात रात्री उशिरा धावणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. धीम्या मार्गावरील काही लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.
नागरिकांनी बदललेल्या वेळापत्रकानुसार प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासाने केले आहे.
संबंधित बातम्या