मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Local Mega Block : कर्जत-बदलापूर मार्गावर रेल्वेचा मेगाब्लॉक; पाहा लोकलचं बदललेलं वेळापत्रक

Mumbai Local Mega Block : कर्जत-बदलापूर मार्गावर रेल्वेचा मेगाब्लॉक; पाहा लोकलचं बदललेलं वेळापत्रक

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 16, 2023 01:36 PM IST

Mumbai Local Train : रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि पाहणीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.

Mumbai Local Mega Block Today
Mumbai Local Mega Block Today (HT)

Mumbai Local Train Mega Block : मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कारण सेन्ट्रल रेल्वेने नेरळ स्टेशनवर स्विच ब्लॉक आणि कल्याण-बदलापूर मार्गावर मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी रात्री ते रविवारी रात्री पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार असून त्यामुळं लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यामुळं आता ऐन वीकेंडलाच मुंबईकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. मुंबईतील तिन्ही मार्गांवर उद्या म्हणजेच रविवारी विशेष मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. त्यापूर्वीच कर्जत-बदलापूर मार्गावरही मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कर्जत-बदलापूर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने या मार्गावरील रेल्वेंचं वेळापत्रक कोलमडलं आहे. हैदराबाद-सीएसएमटी अप एक्स्प्रेस, दादर-शिर्डी डाऊन एक्सप्रेस, भुवनेश्वर-सीएसएमटी अप एक्सप्रेस आणि विशाखापट्टणम-लोकमान्य टर्मिनल्स या रेल्वे पनवेल-कर्जत मार्गावर वळवण्यात आल्या आहे. याशिवाय या सर्व रेल्वे कल्याण स्टेशनवर थांबणार नाही. ठाणे रेल्वे स्टेशनवर या गाड्या थांबणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. मुंबईतील लोकल रेल्वेगाड्यांचंही वेळापत्रक या मेगाब्लॉकमुळं कोलमडणार आहे.

शिवाजी महाराज टर्मिनल्स अप एक्सप्रेस तब्बल ४० मिनिटांच्या उशीरानं सीएसटीला पोहचणार आहे. सीएसएमटीहून कर्जतला जाणारी शेवटची लोकल रात्री ११ वाजून १८ मिनिटांनी सुटणार आहे. तसेच पहाटे चार वाजून २८ मिनिटांनी सीएसटीहून कर्जतला लोकल धावणार आहे. कर्जत- सीएसटी रेल्वे कर्जतऐवजी अंबरनाथपर्यंत धावणार आहे. कर्जत लोकल- सीएसएमटी रेल्वे कर्जत ऐवजी बदलापूर पर्यंत धावणार आहे. कर्जत लोकल बदलापूरहून अंबरनाथकडे जाणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. या सर्व लोकल नियोजित वेळेपेक्षा २० ते ३० मिनिटांच्या उशीराने धावणार असल्याचंही रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.

WhatsApp channel