Mumbai local megablock : मुंबईत रविवारी लोकलचा खोळंबा! मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai local megablock : मुंबईत रविवारी लोकलचा खोळंबा! मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

Mumbai local megablock : मुंबईत रविवारी लोकलचा खोळंबा! मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

Jun 22, 2024 11:15 AM IST

Mumbai 23 June local mega block : मुंबईत उद्या रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. यामुळे उद्या घराबाहेर पडण्याआधी रेल्वेचे वेळापत्रक पाहून घराबाहेर पडावे लागणार आहे.

 मुंबईत रविवारी लोकलचा खोळंबा! मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
मुंबईत रविवारी लोकलचा खोळंबा! मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

Mumbai 23 June local megablock : मुंबईत उद्या रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते विद्याविहारदरम्यान आणि सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहे. तर, माहीम गोरेगावदरम्यान हार्बर मार्गावर पश्चिम रेल्वेने देखील देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घोषित केला आहे. यामुळे या तिन्ही मार्गावरील काही लोकलच्या फेऱ्या या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या या उशिराने धावणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना रविवारी रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच बाहेर पडावे लागणार आहे.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार उद्या सकाळी १०.५५ ते दुपारी ३.२५ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

ब्लॉक काळात असे असेल रेल्वेचे वेळापत्रक

सीएसएमटी-चुनाभट्टी / वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे-सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉक काळात सीएसएमटी येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.२४ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धिम्या लोकल या सीएसएमटी व विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. तर धिम्या मार्गावरील गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. या गाड्या डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. तर घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.१० पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील लोकल या विद्याविहार व सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. या लोकल गाड्यांणा कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकावर थांबणार आहे.

या लोकल बंद राहतील

सीएसएमटीसाठी / वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ दरम्यान वाशी, बेलापूर, पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. तर सीएसएमटीसाठी सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत सुटणाऱ्या वांद्रे गोरेगाव डाऊन हार्बर मार्गावरील लोकल बंद ठेवण्यात आल्या आहेत.

ब्लॉक काळात सीएसएमटी कुर्ला आणि पनवेल वाशी विभागांदरम्यान विशेष लोकल धावणार आहेत. तर या काळात हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी नेरुळ स्थानकावरून सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवास करता येणार आहे.

माहीम गोरेगावदरम्यान ब्लॉक

पश्चिम रेल्वेच्या हार्बर मार्गावर माहीम व गोरेगाव स्थानकादरम्यान सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान अप व डाउनवर ब्लॉक घेण्यात आल्याने या काळात सीएसएमटी वांद्रे सीएसएमटी, सीएसएमटी पनवेल गोरेगाव सीएसएमटीम, पनवेल गोरेगाव सीएसएमटी / पनवेलसोबत चर्चगेट गोरेगाव चर्चगेट धीम्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

डाऊन धिम्या मार्गावर अशी असेल वाहतूक

सीएसएमटी येथून सकाळी १०.१८ वाजता सुटणारी ठाणे लोकल डाऊन धिम्या मार्गावरील ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल असेल. सीएसएमटी येथून दुपारी ३.३२ वाजता सुटणारी आसनगाव लोकल ब्लॉकनंतर पहिली लोकल असेल.

अप धिम्या मार्गावर सीएसएमटीसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल कल्याण येथून सकाळी ९.१३ वाजता सुटेल. तर सीएसएमटीसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल कल्याण येथून दुपारी २.३३ वाजता सुटणार आहे.

डाऊन हार्बर-

सीएसएमटी येथून ब्लॉकपूर्वीची पनवेलसाठीची शेवटची लोकल सकाळी ११.०४ वाजता असेल. सीएसएमटी येथून गोरेगावसाठी शेवटची लोकल सकाळी १०.२२ वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पनवेलसाठी पहिली सीएसएमटी येथून दुपारी ४.५१ वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल वांद्रे असून, सीएसएमटी येथून दुपारी ४.५६ वाजता सुटेल.

अप हार्बर

सीएसएमटीसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी ९.४० वाजता सुटेल. सीएसएमटीसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल वांद्रे येथून सकाळी १०.२० वाजता सुटेल. सीएसएमटीसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल येथून दुपारी ३.२८ वाजता सुटेल. गोरेगाव येथून ब्लॉकनंतर दुपारी ४.५८ वाजता सीएसएमटीसाठी पहिली लोकल सुटेल.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर