लोकल रेल्वे मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हटली जाते. आता मध्य-हार्बर मार्गावर रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज व उद्या (२७ व २८ जानेवारी) मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मस्जिद बंदर या स्थानकादरम्यान विशेष आपत्कालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. कर्नाक आरओबी (टप्पा-२) च्या पुनर्बांधणीसाठी ओपन वेब गर्डर्सच्या समायोजनासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
रविवारीही ब्लॉक घेण्यात आला होता. आता आज व उद्या म्हणजेच मुंबई मध्य व हार्बर मार्गावर सलग तीन दिवस रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. २६, २७ आणि २८ नोव्हेंबर असे तीन दिवस हा विशेष रात्रकालीन ट्रॅफिक ब्लॉक असणार आहे. त्यामुळे काही गाड्याच्या वेळापत्रकांवर परिणाम होण्य़ाची शक्यता आहे.
मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रात्रीकालीन ब्लॉक घेतला जाणार आहे. सोमवारी आणि मंगळवारी रात्री १२.५० ते पहाटे ५:३० वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे.सीएसएमटी आणि वडाळा रोड स्थानकादरम्यान हार्बर मार्गावर अप आणि डाऊन या मार्गावर रात्री मेगाब्लॉक असणार आहे. तसेच भायखळा आणि सीएसएमटी दरम्यान मुख्य मार्गावर धीम्या आणि जलद या मार्गावर ब्लॉक असणार आहे.
या विशेष ब्लॉक काळात मध्य मार्गावरील भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान आणि हार्बर मार्गावर वडाळा रोड ते सीएसएमटी स्थानकांदरम्यान लोकल सेवा बंद राहतील.
मध्य मार्गावरील अप आणि डाऊन लोकल सेवा कल्याण, ठाणे, कुर्ला, परळ आणि भायखळा स्थानकांपर्यंत धावतील व सुटतील.
हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा वडाळा रोड स्टेशनपर्यंत धावतील.
यामध्ये सोमवारी आणि मंगळवारी (२७/२८ जानेवारी) रोजी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेच्या सिझर क्रॉसिंग आणि डबल डायमंड स्वीचच्या नूतनीकरणासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे प्रवाशांना काहीसा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या