Mumbai Local Mega Block : रविवारी प्रवासाचे नियोजन करताय? लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक-mumbai local mega block news mega block on central and western railway on sunday 12 may ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Local Mega Block : रविवारी प्रवासाचे नियोजन करताय? लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक

Mumbai Local Mega Block : रविवारी प्रवासाचे नियोजन करताय? लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक

May 10, 2024 11:40 PM IST

Mumbai Mega Block : मुंबईत लोकलच्या मध्य, पश्चिम व हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे रविवारी घराबाहेर पडण्याआधी वेळापत्रक पाहावे लागणार आहे.

मुंबईत लोकलच्या तिन्ही मागावर मेगाब्लॉक (संग्रहित छायाचित्र)
मुंबईत लोकलच्या तिन्ही मागावर मेगाब्लॉक (संग्रहित छायाचित्र)

मध्य व पश्चिम रेल्वेच्या (Indian Railway) मुंबई विभागाच्यावतीने रविवारी १२ मे रोजी रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहेl. या मेगा ब्लॉकमुळे हार्बर, पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या लोकल वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे रविवारी रेल्वेने प्रवास करण्याआधी मेगा ब्लॉकबाबत जाणून घ्यावे.

मध्य रेल्वे मार्गावरील मेगा ब्लॉक - 

मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा – मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी ११.१० ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटीहून ठाण्याकडे सुटणाऱ्या आणि सीएसएमटी येथे जाणाऱ्या अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा – मुलुंड स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. त्यामुळे लोकल सेवा १५ मिनिटे विलंबाने धावतील.

हार्बर रेल्वे मार्गावरील ब्ल़ॉक -

हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत सीएसएमटी ते वाशी / बेलापूर / पनवेल अप आणि डाऊन लोकल रद्द अकरण्यात येणार आहेत. 

ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल – वाशी यादरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ या कालावधीत ठाणे, वाशी, नेरूळ रेल्वे स्थानकांदरम्यान प्रवास करण्याची परवानगी असेल. 

पश्चिम रेल्वे मार्गावरील ब्लॉक -

पश्चिम रेल्वे मार्गावरील सांताक्रूझ – गोरेगावदरम्यान अप व डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत या मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. या काळात सांताक्रूझ – गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील धीम्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल विलेपार्ले आणि राम मंदिर स्थानकावर थांबणार नाहीत.त्याचबरोबर  ब्लॉक कालावधीत काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

Whats_app_banner