Local Mega Block : रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी मुंबईत प्रत्येक रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येतो. यामुळे सुट्टीदिवशी दिवसभर मुंबईकरांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. मात्र यावेळी मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. रविवारी लोकल रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही. हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर येत्या रविवारी (२९ जानेवारी २०२३) मेगाब्लॉक नाही. त्यामुळे फिरायला जाण्याचा बेत करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.
रेल्वे प्रशासनाने सांगितले की, रविवारी तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही मात्र मध्य रेल्वेच्या खडावली ते आसनगाव रेल्वे स्थानकादरम्यान शनिवारी व रविवारी रात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे लोकल रेल्वे सेवा आणि लांब पल्याचा मेल-एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावर शनिवारी मध्यरात्री ०२.०५ ते पहाटे ०४.०५ या वेळेत खडवली आणि आसनगाव दरम्यान अप आणि डाउन मार्गांवर रात्रीचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगची कामे या दरम्यान केली जातील.
पॉवर ब्लॉकमुळे लोकल सेवेवर होणार परिणाम -
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री सव्वा बारा वाजता कसारासाठी सुटणारी लोकल ठाणे येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.
कसारा येथून पहाटे सव्वा तीन वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणारी लोकल ठाणे येथून सोडण्यात येईल.
खालील लांब पल्ल्याच्या गाड्या आसनगाव, आटगाव, खर्डी, कसारा येथे ३५ मिनिटे ते ९५ मिनिटांपर्यंत थांबल्या जातील व विलंबना गंतव्याकडे रवाना होतील.